Neeta Ambani On Rohit Sharma: आयपीएल २०२६ स्पर्धेची सुरुवात २८ मार्चपासून होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सनरायझर्स हैदराबादचा सामना करणार आहे. तर ५ वेळचा चॅम्पियन संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्याने आपल्या हंगामाची सुरूवात करणार आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कसून सराव करत आहेत. दरम्यान खेळाडूंना भेटण्यासाठी संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. भेटीदरम्यान रोहित शर्मा समोर येताच, नीता अंबानींनी दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रोहित शर्मा आणि नीता अंबानी यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रोहित समोर येताच नीता अंबानी यांना आश्चर्याचा धक्का बसतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नीता अंबानी या रोहित शर्माची फिटनेस पाहून आश्चर्यचकीत झाल्या आहेत. नीता अंबानी म्हणाला, “देवा! रोहित, मी तुला ओळखलंच नाही. तू तर अगदी लहान मुलासारखा (तरुण) दिसतोयस.” नीता अंबानी यांच्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

रोहित शर्माला पाहून अशी रिअॅक्शन येणं साहजिक आहे. कारण त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर जोर दिला. त्याने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या तो वनडे संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे आपल्या फिटनेसवर मेहनत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे. या संधीचा फायदा घेत त्याने जिममध्ये कसून मेहनत घेतली आणि वजन कमी केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्वांना रोहित शर्माच २.० व्हर्जन पाहायला मिळालं. केवळ फिटनेसवर नाही, तर त्याने आपल्या फलंदाजीवरही कसून मेहनत घेतली आहे. गेल्या काही मालिकांमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. आता आयपीएल २०२६ स्पर्धेत तो कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ:

रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, शार्दुल ठाकूर (ट्रेड), शेरफन रूदरफोर्ड (ट्रेड), मयंक मार्कंडे (ट्रेड), क्विंटन डीकॉक दीपक चहर, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, मिचेल सँटनर, कार्बिन बॉश, राज अंगद बावा, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत, दानिश मलेवार, मोहम्मद इझहर