आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत शे होपच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजने साखळी फेरीपासून एकही सामना गमावला नव्हता. त्यामुळे वेस्ट इंडिजला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण भारतीय संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातील पराभवानंतर वेस्ट इंडिजला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. पण वेस्ट इंडिजचे खेळाडू अजूनही आपल्या मायदेशी जाऊ शकलेले नाहीत. त्यामुळे वेस्ट इंडिजचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

डॅरेन सॅमीने आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, “मला घरी जायचं आहे…” असं लिहिलं आहे. इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडलेला वेस्ट इंडिजचा संघ पुर्वनियोजित वेळापत्रकानुसार,मायदेशी परतु शकलेला नाही. आता त्यांची घरी परतण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षेबाबत मोठी अपडेट दिली आहे. सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य सुरक्षित असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. त्यांना सुरक्षित घरी पाठवण्यासाठी आवश्यत व्यवस्था केली जात आहे. इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे या भागातील हवाई मार्ग बंद करण्यात आला आहे.

वेस्ट इंडिजचा संघ मायदेशी परतण्याआधी झिम्बाब्वेचा संघ देखील स्पर्धेतून बाहेर पडला होता. झिम्बाब्वेचा संघ मायदेशी जात असतानाही अशीच समस्या निर्माण झाली होती. झिम्बाब्वेचा संघ दुबईमार्ग हरारेला रवाना होणार होता. परंतु, हा हवाई मार्ग बंद असल्याने आयसीसीने पर्यायी व्यवस्था केली आणि झिम्बाब्वेला अदीस अबाबामार्गे वेगवेगळ्या गटांत हरारेसाठी रवाना केलं. झिम्बाब्वेचे खेळाडू आपल्या मायदेशी सुखरुप परतले आहेत.

वेस्ट इंडिजने या स्पर्धेतील साखळी फेरीत दमदार कामगिरी केली होती. साखळी फेरीत एकही सामना न गमावता या संघाने स्पर्धेतील सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होतं. सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजला भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. तर भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.