भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकावी ही माझी इच्छा – सौरव गांगुली

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत भारत आघाडीवर

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपल्या परदेश दौऱ्याची चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात विजय मिळवत भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मात्र बीसीसीआयचं अध्यक्षपद स्विकारलेल्या सौरव गांगुलीला विराट कोहलीच्या भारतीय संघाकडून वेगळीच अपेक्षा आहे. विराटने न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकावी अशी इच्छा सौरवने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली.

अवश्य वाचा – Ind vs NZ : असं काय घडलं की विराटवर आली तोंड लपवण्याची वेळ…

“यंदा मालिका विजयाची शक्यता चांगली आहे. मागच्यावेळी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये ४-१ ने विजय मिळवला होता. पण त्यांनी कसोटी मालिका जिंकावी अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक मालिका ही महत्वाची असतेच, पण कसोटी मालिकेतला विजय हा खास असतो. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे”, सौरव ABP News ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs NZ : विराट कोहलीचा रोहित शर्माला धोबीपछाड

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला परदेश दौरा आहे, त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : विराटसेनेने गाजवलं ऑकलंडचं मैदान, अनोखी कामगिरी करणारा पहिला आशियाई संघ

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I want them to win test series bcci chief sourav ganguly sets goals for virat kohli led team india in nz psd

Next Story
Ind vs NZ : तिसऱ्या सामन्यात कसा असेल भारताचा संघ, सांगतोय विराट कोहली…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी