आफ्रिका दौऱ्यात प्रत्येक ‘स्ट्रोक’ खेळण्याआधी दोनवेळा विचार करेन- चेतेश्वर पुजारा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने आफ्रिकेत पोहोचताच पहिल्या दिवशी कसून सराव केला. अवघ्या पंधरा कसोटी सामन्यांत पाच शतके ठोकणारा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने आफ्रिकेत पोहोचताच पहिल्या दिवशी कसून सराव केला. अवघ्या पंधरा कसोटी सामन्यांत पाच शतके ठोकणारा आणि कसोटी फलंदाजीत ६५.५०ची सरासरी राखणारा भारताचा संयमी फलंदाज चेतेश्वर पुजारेने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिका दौऱ्यावर उत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.
तरीसुद्धा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना कोणताही स्ट्रोक खेळण्याआधी दोनवेळा विचार करेन असे म्हणत कसोटी सामन्यात खेळपट्टीची सांगोपांग माहिती घेत संयमी खेळी करणार असल्याचे मत पुजाराने व्यक्त केले.
सरावादरम्यान, आफ्रिकेच्या डेल स्टेन, मॉरकेल यांच्या गोलंदाजीला कसे कडवे प्रत्युत्तर देता येईल हा दृष्टीकोन राहील. असेही पुजारा म्हणाला. त्याचबरोबर मैदानावर उभे राहून द्वीशतक ठोकणे ही कठीण गोष्ट असली तरी, त्याचा संघाला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
एका दिवस फलंदाजी करून नाबाद राहणे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीला मैदानात येणे या दोन्हीवेळी शाररीक आणि मानसिक क्षमता यात फरक असतो. तो संतुलित राखणे महत्वाचे आहे. एकदा तुम्हाला खेळपट्टी परिचयाची झाली की चांगली फलंदाजी करता येते असेही पुजारा म्हणाला. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I will think twice before playing my strokes in south africa says cheteshwar pujara