‘आयसीसी’ कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर

पीटीआय, दुबई : मायदेशातील दिमाखदार कामगिरीच्या बळावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२१-२२च्या हंगामाअखेरीस ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारीचे अग्रस्थान टिकवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी क्रमवारीत मात्र भारत नऊ गुणांनी पिछाडीवर पडल्यामुळे ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड वार्षिक एकदिवसीय क्रमवारीत अव्वल संघ ठरला.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील २०२१ मध्ये सुरू झालेल्या कसोटी मालिकेचा समावेश पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर क्रमवारीत बदल करण्यात येईल. ट्वेन्टी-२० क्रमवारीत पाच गुणांच्या फरकाने इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या वार्षिक कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतापासून नऊ गुणांची आघाडी मिळवली आहे. तर पाकिस्तानचा संघ  पाचव्या स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत तिसऱ्या तर, दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानी आहे. भारताला एका गुणाचा फायदा झाला असून त्यांचे ११९ गुण झाले आहेत. तर भारताविरुद्ध २०१८ मध्ये ४-१ अशी मालिका इंग्लंडने जिंकली होती, पण ही मालिका क्रमवारीतून हटवण्यात आल्याने त्यांना सर्वाधिक नऊ गुणांचे नुकसान झाले आहे.

सांघिक कसोटी क्रमवारी

१. ऑस्ट्रेलिया १२८ गुण

२. भारत ११९ गुण

३. न्यूझीलंड १११ गुण

४. दक्षिण आफ्रिका ११० गुण

५. पाकिस्तान ९३ गुण

सांघिक एकदिवसीय क्रमवारी

१. न्यूझीलंड १२५ गुण

२. इंग्लंड १२४ गुण

३. ऑस्ट्रेलिया १०७ गुण 

४. भारत १०५ गुण

५. पाकिस्तान १०२ गुण

सांघिक ट्वेन्टी-२० क्रमवारी

१. भारत २७० गुण

२. इंग्लंड २६५ गुण

३. पाकिस्तान २६१ गुण

४. दक्षिण आफ्रिका २५३ गुण

५. ऑस्ट्रेलिया २५१ गुण