scorecardresearch

Premium

ICC T20 World Cup 2024: टी२० विश्वचषक २०२४साठी ICCने तीन ठिकाणांच्या नावांना दिली मान्यता, कोणते आहेत ते? जाणून घ्या

T20 World Cup 2024: आगामी टी२० स्पर्धेसाठी आयसीसीने अमेरिकेतील तीन स्टेडियमच्या नावाची घोषणा केली असून, या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या सामन्याच्या आयोजनाचा मान देखील अमेरिकेलाच मिळण्याची शक्यता आहे.

T20 World Cup 2024: Historic matches of T20 World Cup will be played at these three places in America ICC gave information
आगामी टी२० स्पर्धेसाठी आयसीसीने अमेरिकेतील तीन स्टेडियमच्या नावाची घोषणा केली. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

ICC T20 World Cup 2024: या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. कोणताही विश्वचषक अमेरिकेत खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. आता आयसीसीने आणखी एक पाऊल पुढे टाकत अमेरिकेतील यजमान शहरांची नावे जाहीर केली आहेत.

आयसीसीने २०२४च्या टी२० विश्वचषकाचे यजमान म्हणून यूएससाठी तीन ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये डेल्लास, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्कचा समावेश आहे. डेल्लासमधील ग्रँड प्रेरी, फ्लोरिडामधील ब्रॉवर्ड काउंटी आणि न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी येथे टी२० विश्वचषक सामन्यांचे आयोजन करून एक ऐतिहासिक नोंद केली जाईल. वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स यांना नोव्हेंबर २०२१मध्ये आयसीसी बोर्डाने स्पर्धेचे यजमानपद दिले होते. आता आयसीसीने अनेक पर्यायांचे तपशीलवार आणि सर्वसमावेशक मूल्यांकन केल्यानंतर अमेरिकेतील स्थळांची निवड केली आहे.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
World Cup 2023: “मला माहित नाही की हा संघ…”; विश्वचषकापूर्वी हरभजन सिंगने टीम इंडियाच्या एकजुटीवर उपस्थित केला प्रश्न
India vs Netherlands practice match Updates
IND vs NED Warm Up: संजू सॅमसनच्या शहरात होणाऱ्या टीम इंडियाच्या सामन्याकडे चाहते फिरवणार पाठ? जाणून घ्या कारण
World Cup 2023: Pakistani team did not get visa for the World Cup plan to come via Dubai cancelled Babar-PCB worried
World Cup 2023: ‘व्हिसा’मुळे पाकिस्तानच्या विश्वचषक २०२३च्या तयारीवर टांगती तलवार, भारतात येण्याची परवानगी अद्याप नाही मिळाली
India has a chance to overtake Australia to become number one in the ICC rankings eyes will be on Ashwin-Surya
IND vs AUS 1st ODI: वर्ल्डकपची रंगीत तालीम आजपासून! ICC रॅकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला मागे टाकून नंबर वन होण्याची भारतला संधी

आयझेनहॉवर पार्कमधील ३४,००० आसनांचे मॉड्यूलर स्टेडियम न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटीमधील करारानुसार बांधले जाईल. याव्यतिरिक्त, ग्रँड प्रेरी आणि ब्रॉवर्ड काउंटीमधील जुन्या स्टेडियममध्ये काही बदल करून अधिक चाहते आणि गॅझेट्स सामावून घेण्यासाठी विस्तारित केले जातील. करारानुसार, प्रीमियम हॉस्पिटॅलिटी एरिया देखील जोडला जाईल.

हेही वाचा: IND vs AUS 1st ODI: वर्ल्डकपच्या तयारीची भारताला शेवटची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अश्विनला मिळणार का संधी?

आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला अमेरिकेतील तीन जागांची घोषणा करताना आनंद होत आहे, ज्यात टी२० विश्वचषक ट्रॉफीसाठी २० संघ स्पर्धा करतील. आतापर्यंतचा सर्वात मोठा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आयोजित केला जाईल. अमेरिका ही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि या ठिकाणे आम्हाला जगातील सर्वात मोठ्या क्रीडा बाजारपेठेत प्रवेश करण्याची उत्तम संधी या निमित्ताने मिळेल. आम्ही देशातील अनेक संभाव्य ठिकाणांचे पर्याय शोधले आहेत आणि संभाव्य यजमान देशातील उत्साहामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. या अशा उत्साहामुळे विविध समुदायांना एकत्र आणण्यात क्रिकेटबद्दलची वाढती जागरूकता मजबूत करण्यात मदत होईल.”

आयसीसीने निवेदनात पुढे म्हटले की, “अशा ठिकाणी जागतिक दर्जाचे क्रिकेट आयोजित करण्यासाठी मॉड्युलर स्टेडियम तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. यामुळे अमेरिकन क्रिकेट चाहत्यांना जगातील सर्वोत्तम क्रिकेट सामने त्यांच्या दारात पाहण्याची संधी मिळणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर स्थळ क्षमता वाढवण्यासाठी मागील ICC स्पर्धांमध्ये केला गेला आहे आणि जगभरातील इतर प्रमुख खेळांमध्ये नियमितपणे वापरला जातो. यूएसमध्ये आम्हाला डेल्लास आणि फ्लोरिडा या दोन्ही स्टेडियमचा आकार वाढवण्याची आणि न्यूयॉर्कमध्ये एक उत्तम ठिकाण तयार करण्याची संधी मिळेल.”

हेही वाचा: ICC WC Winners List: १९७५ ते २०१९ कसा होता विश्वचषक ट्रॉफीचा प्रवास? कोणत्या संघाने किती वेळा जिंकला वर्ल्डकप? जाणून घ्या

सध्या अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत मेजर क्रिकेट लीग ही स्पर्धा खेळली गेली. यामध्ये जगभरातील अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला. त्यासोबतच विविध देशातील क्रिकेटपटू अमेरिकेत खेळण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मोठे उद्योगपती देखील अमेरिकेत गुंतवणूक करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc approves three places in america icc gave information names of venues for t20 world cup 2024 avw

First published on: 21-09-2023 at 09:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×