Suryakumar Yadav ICC Men’s T20I Cricketer of the Year 2022: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव फॉर्मात आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामन्यांमध्ये तुफानी कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये सूर्याने खूप प्रभावित केले. त्याने गेल्या वर्षी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११६४ धावा केल्या होत्या. सूर्याच्या दमदार कामगिरीबद्दल आयसीसीने त्याला विशेष बक्षीस दिले आहे. सूर्यकुमार यादवची ICC ने २०२२ सालच्या ‘पुरुष टी२० क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही सूर्याचे विशेष ट्विट करून अभिनंदन केले आहे.

भारतीय संघाचा धुरंधर फलंदाज सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये धूम ठोकली. सूर्या ‘द-स्काय’ टी२० मध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या कामगिरीला आयसीसीनेही सलाम केला आहे. सूर्याला ICC पुरूष क्रिकेटपटू ऑफ द इयर २०२२चा पुरस्कार मिळाला आहे. त्याने १८७.४३ च्या स्ट्राइक रेटने १६४ धावा केल्या. मागील वर्षात मिस्टर ३६० सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
Virender Sehwag Says Yuzvendra Chahal's brilliant bowling
IPL 2024 : वीरेंद्र सेहवागला राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला विश्वचषक खेळताना पाहायचंय; म्हणाला, “तो टी-२० क्रिकेटचा महान…”
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs PBKS: गुजरातला नकोसा ‘यश’, बंगळुरूसाठी मौल्यवान; कॉमेंट्रीदरम्यान कोणी केलं असं वक्तव्य?
ipl 2024 match prediction punjab kings vs delhi capitals
IPL 2024 : पुनरागमनवीर पंतवर लक्ष!,‘आयपीएल’मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सची पंजाब किंग्जशी सलामी

सूर्याने २०२२ मध्ये हा विक्रम मोडला. त्याने १००० पेक्षा जास्त टी२० धावा केल्या. एका कॅलेंडर वर्षात १००० पेक्षा जास्त टी२० धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने २०२२ मध्ये ६८ षटकार मारले असून हा देखील एक मोठा विक्रम आहे. या विशेष कामगिरीमुळे सूर्याची आयसीसी पुरुषांचा टी२० प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. आयसीसीने ट्विट करून याबाबत माहिती दिली.

बीसीसीआयने सूर्याचे खास अभिनंदन केले आहे. बोर्डाने सूर्याचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि ICC पुरुष टी२० क्रिकेटर ऑफ द इयर बनल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआयने सूर्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या दमदार कामगिरीची झलक पाहायला मिळत आहे. आयसीसीचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार गेल्या वर्षीपासून सुरू झाला. पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानला २०२१ साठी हा पुरस्कार मिळाला. यावेळी सूर्याशिवाय रिजवान, इंग्लंडचा सॅम कुरान आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांना नामांकन देण्यात आले.

हेही वाचा: Virat Kohli: वन डे फॉरमॅटमध्ये मी पहिल्या क्रमांकावर! कोहलीपेक्षा चांगले खेळून देखील मी दुर्लक्षित, पाक फलंदाजाचा खळबळजनक दावा

विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी आतापर्यंत ४५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १५७८ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ३ शतके आणि १३ अर्धशतके केली आहेत. सूर्याचा टी२० मधील सर्वोत्तम धावसंख्या ११७ धावा होता. सूर्यकुमार यादव सध्याच्या घडीला टी२० मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे. त्याचे सध्या ९०८ रेटिंग गुण आहेत. गेल्या वर्षीच तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. सूर्याने २०२३ ची सुरुवातही जोरदार केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत सूर्याने अर्धशतक आणि एक शतक झळकावले. तसेच तो टी२० मध्ये सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा भारतीय फलंदाज बनला आहे.