ICC On England Cricket Board: इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत मायदेशात खेळताना इंग्लंडला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत अनेक नाट्यमय घटना घडल्या. मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यातून बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केलं, पण हा सामना सुरु असतानाच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. बीबीसीच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) बेन स्टोक्सच्या निवृत्तीच्या संदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या.
इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर पार पडला होता. या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधीच स्टोक्सने ड्रेसिंग रुममध्ये निवृत्तीचा निर्णय आपल्या सहकाऱ्यांना कळवला होता. स्टोक्सने आपला निर्णय सांगितल्याचा व्हिडीओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसिद्ध करण्यात आला होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, आयसीसीने असा आरोप केला आहे की, आंतरराष्ट्रीय सामना सुरु असताना खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात (players and match officials area) काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. आयसीसीच्या कलम २.२.११ नुसार, कुठल्याही क्रिकेट बोर्डाला ड्रेसिंग रुममध्ये रेकॉर्डिंग करण्याची परवानगी नाही. आयसीसीने असा आरोप केला आहे की, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सामना समाप्त होण्यापूर्वीच बेन स्टोक्सने ड्रेसिंग रुममध्ये जे भाषण केलं, त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. हे आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन आहे. हे नियम ड्रेसिंग रुमची गोपनियता टिकवून ठेवण्यासाठी बनवले गेले आहेत. आता आयसीसी काय कारवाई करणारहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी बेन स्टोक्स निवृत्त होत असल्याची अधिकृत माहिती बाहेर आली होती. या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टोक्सने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. स्टोक्स निवृत्ती जाहीर करणार आहे, हे आधीच ठरलं होतं. मुख्य बाब म्हणजे, ज्यावेळी त्याने निवृत्तीची घोषणा केलीत त्यानंतर तो गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. यादरम्यान त्याने आपल्याच पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली होती. त्याने फॉल्क्सला झेलबाद करुन माघारी धाडलं होतं.
बेन स्टोक्सने बरेच वर्ष तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. तो जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून एकूण २७९ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ११३२१ धावा केल्या.फलंदाजीसह त्याने गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली. त्याच्या नावे एकूण ३५२ गडी बाद करण्याची नोंद आहे. मुख्य बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याआधी त्याने शेवटच्या सामन्यात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये ७००० धावा आणि २५० विकेट्स पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जॅक कॅलिसनंतर जगातील दुसराच अष्टपैलू खेळाडू ठरला.
