ICC 2023-27 Schedule: येत्या पाच वर्षांत होणार तब्बल ७७७ क्रिकेट सामने; आयसीसीने जाहीर केले पुरुष क्रिकेटचे वेळापत्रक

ICC Future Tours Program: आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पुढील पाच वर्षांत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे देश सर्वाधिक कसोटी सामने खेळतील.

ICC 2023-27 Schedule: येत्या पाच वर्षांत होणार तब्बल ७७७ क्रिकेट सामने; आयसीसीने जाहीर केले पुरुष क्रिकेटचे वेळापत्रक
फोटो सौजन्य – ट्विटर

आगामी पाच वर्षांमध्ये क्रिकेट चाहत्यांना मोठी पर्वणी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने पुरुष क्रिकेटच्या पुढील टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. २०२१ ते २०१७ या कालावधीत १२ देशांदरम्यान तिन्ही फॉरमॅटमध्ये ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. यामध्ये १७३ कसोटी, २८१ एकदिवसीय आणि ३२३ टी-२० सामने होणार आहेत. सध्याच्या टप्प्यातील सामन्यांपेक्षा पुढील टप्प्यातील सामन्यांची संख्या जास्त आहे.

द्विपक्षीय मालिकांव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमध्ये मोठ्या स्पर्धांचाही समावेश करण्यात आलेला आहे. पुढील वर्षी भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकापासून याची सुरुवात होईल. त्यानंतर २०१४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे टी २० विश्वचषकाचे आयोजिन करणार आहेत. पाकिस्तान २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. तर, २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका एकत्रित टी २० विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. २०२७ मध्ये, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे विश्वचषक आयोजित करणार आहेत.

आयसीसीच्या वेळापत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामन्यांची संख्या आहे. आगामी टप्प्यात दोन्ही संघ दोन कसोटी मालिका खेळणार आहेत. पण, यावेळी सामन्यांची संख्या चारवरून पाच करण्यात आली आहे. म्हणजेच दोन्ही संघ आता प्रत्येक पाच-पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळतील. यातील एक मालिका २०२३-२४ ​​मध्ये ऑस्ट्रेलियात होईल. तर, दुसरी मालिका २०२५-२६मध्ये भारतात होईल.

हेही वाचा – “मी सचिनकडून अपेक्षा ठेवणं…”; विनोद कांबळी करतोय आर्थिक संकटाचा सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची ही ३० वर्षांतील पहिलीच वेळ असेल. यापूर्वी १९९२ मध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त भारत आणि इंग्लंडदरम्यानही पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पुढील पाच वर्षांत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे देश सर्वाधिक कसोटी सामने खेळतील. यामध्ये इंग्लंड एकूण २२ सामने खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि भारत अनुक्रमे २१ आणि २० कसोटी सामने खेळणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc has announced 2023 to 2027 future tours program cricket calendar including bilateral international series vkk

Next Story
“मी आणि शेन वॉर्न रिलेशनशीपमध्ये होतो,” ‘वर्ल्ड्स हॉटेस्ट ग्रँडमा’ म्हणवणाऱ्या अडल्ट स्टारचा खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी