ICC World Cup 2023 Prize Money Announced: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात आयोजित केला जाणार आहे. भारत एकट्याने या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होईल, तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांना बक्षीस रक्कम जाहीर केली.

विजेत्याला मिळणार ३३.१८ कोटी रुपये –

आयसीसीने या स्पर्धेची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. या वेळी चॅम्पियन ठरणाऱ्या संघाला ३३.१८ कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला १६.५९ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याचा अर्थ विजेत्या संघासोबतच अंतिम फेरीत हरणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव केला जाईल.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
aamir khan got award red sea films
आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
icc agree for hybrid format for 2025 champions trophy
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच? २०२७ सालापर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी हाच नियम
bitcoin surges above 100000 usd for the first time in 2024
‘बिटकॉइन’ तेजीचे १ लाख डॉलरचे शिखर
India beat UAE by 10 Wickets reach U19 Asia Cup semi final 2025
U19 Asia Cup 2024 : टीम इंडिया यूएईवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत दाखल, वैभव-आयुषने झळकावली अर्धशतकं
Ajinkya Rahane likely to lead KKR in IPL 2025
IPL 2025 : व्यंकटेश अय्यर नव्हे तर ‘हा’ भारतीय फलंदाज करणार KKR चे नेतृत्त्व? त्याच्या नेतृत्वाखाली जिंकल्यात अनेक ट्रॉफी

उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघाला किती पैसे मिळणार?

या विश्वचषकात, उपांत्य फेरीत पोहोचलेल्या सर्व संघांपैकी दोन संघ अंतिम फेरीत जातील, परंतु इतर दोन संघ जे उपांत्य फेरीत पोहोचतील परंतु पुढे जाऊ शकणार नाहीत, त्यांनाही प्रत्येकी ६.६३ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. त्याचबरोबर ग्रुप स्टेजपर्यंत राहिलेल्या संघांना प्रत्येकी ८२.९४ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

हेही वाचा – World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पाकचा वेगवान गोलंदाज नसीम शाह झाला भावूक, शेअर केली खास पोस्ट

आयसीसी विश्वचषक २०२३ बक्षीस रक्कम –

विजेता – ३३. १८कोटी
उपविजेता – १६.५९ कोटी
दोन सेमीफायनल – प्रत्येकी ६.६३ कोटी रुपये
ग्रुप स्टेजमधील सर्व संघ – प्रत्येकी ८२.९४ लाख रुपये

आयसीसीने म्हटले आहे की बक्षीस रक्कम २०२५ मध्ये आगामी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकासाठी एक आदर्श ठेवेल. जुलै २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथे होणाऱ्या वार्षिक परिषदेदरम्यान आयसीसीने पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांसाठी समान रक्कम जाहीर केली आहे.

हेही वाचा – भारतात प्रथमच MotoGP शर्यतीचे आयोजन! सुरेश रैनाने सोशल मीडियावर शेअर केला VIDEO

१० संघ प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील –

विश्वचषकाच्या १३व्या हंगामात एकूण १० संघ प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. यजमान असल्यामुळे भारत आधीच पात्र ठरला आहे. तर न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका सुपर लीगमधून पुढे गेले. मात्र, विश्वचषकात पुढे जाण्यासाठी श्रीलंका आणि नेदरलँड्सला पात्रता फेरीत खूप मेहनत करावी लागली. क्रिकेट कॅलेंडरमधील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये १० ठिकाणी ४८ सामने होतील. त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघ ४६ दिवसांच्या स्पर्धेच्या तयारीसाठी दोन सराव सामने खेळणार आहे.

Story img Loader