भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ताज्या आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती करत ८व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर युवा सलामीवीर इशान किशनने ११७ स्थानांनी झेप घेतली आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा इशान किशन आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत ३७व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारत-बांगलादेश यांच्यात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली १ धावेवर माघारी परतला. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज कसोटी व एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. ऑस्ट्रेलियाचा कसोटी फलंदाज मार्नस लाबुशेन याने अव्वल स्थानावरील पकड मजबूत करताना विराटशी बरोबरी केली. आयसीसीने ट्विट करून लाबुशेनला शाब्बासकी दिली. त्याने मागील आठवड्यात इंग्लंडच्या जो रूटला मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले होते.

IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Match Updates in marathi
RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला संयुक्त पहिला खेळाडू
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत लाबुशेनने ५०२ धावा चोपल्या. २८ वर्षीय लाबुशेनने एडिलेड कसोटीच्या पहिल्या डावात १६३ धावांची खेळी केली आणि त्या जोरावर त्याने विराट कोहलीच्या कारकीर्दितील सर्वोत्तम ९३७ रेटींग गुणांशी बरोबरी केली. लाबुशेन आता सर्वाधिक रेटींग गुण असलेल्या फलंदाजांमध्ये ११ व्या क्रमांकावर आला आहे. सर डॉन ब्रॅडमन (९६१), स्टीव्ह स्मिथ (९४७) आणि रिकी पाँटिंग (९४२) हे तीन ऑस्ट्रेलियन लाबुशेनच्या पुढे आहेत.

वेस्ट इंडिजचे गॅर सोबर्स, क्लाइड वॅलकॉट आणि व्हीव्ह रिचर्ड यांच्यासह श्रीलंकाचा कुमार संगकारा ९३८ रेटींग गुणांसह लाबुशेनच्या पुढे आहेत. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हीस हेड यानेही कसोटी क्रमवारीत ७७४ रेटींग गुणांसह सात स्थान वर झेप घेताना सहावा क्रमांक पटकावला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत हेडने शतक झळकावे होते. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनही मोठी भरारी घेतली आहे. हॅरी ब्रूक १५ स्थान वर सरकला आहे आणि तो ५५व्या क्रमांकावर आला आहे. मुलतान कसोटीत तो प्लेअर ऑफ दी मॅच होता. गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा:   Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या वाटेवर, रणजी पदार्पणातच झळकावले शतक, १९८८ च्या पराक्रमाची पुनरावृत्ती

एकदिवसीय क्रमवारीबद्दल बोलायचे तर विराट कोहलीला तीन वर्षांनंतर शतक झळकावण्याचा फायदा मिळाला. विराट कोहलीने शनिवारी चट्टोग्राममध्ये बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ९१ चेंडूत ११३ धावा केल्या. ऑगस्ट २०१९ नंतर ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये कोहलीचे हे पहिले शतक होते. डावखुरा सलामीवीर इशान किशनने १३१ चेंडूत २१० धावांची विक्रमी खेळी केली.

हेही वाचा:   Football World Cup: मोठी बातमी! लिओनेल मेसीकडून निवृत्तीची घोषणा, फायनल ठरणार अंतिम सामना

श्रेयस अय्यरनेही ढाका येथील मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याच्या ८२ धावांच्या जोरावर फलंदाजीच्या यादीत वर जाण्यात यश मिळविले. श्रेयस अय्यर आता २०व्या स्थानावरून १५व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला चार स्थानांचा फायदा झाला आहे. यासह सिराज वनडे क्रमवारीत २२व्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशचा फिरकी अष्टपैलू शाकिब अल हसनला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.