कुमार संगकारा हा क्रिकेटचा राजदूत आणि महान फलंदाज होता. त्याची कारकीर्द ही अचाट अशीच होती आणि नेहमीच त्याने फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणातही दर्जेदार कामगिरी कामगिरी केली, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) रिचर्डसन यांनी व्यक्त करत त्याला सलाम केला.
‘‘आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये त्याने २८,०१६ धावा केल्या आहेत. एक खेळाडू म्हणून नेहमीच त्याने क्रिकेटचा दर्जा उंचावण्याचे काम केले आहे. क्रिकेटला त्याने दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. क्रिकेटला दिलेल्या या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो,’’ असे रिचर्डसन म्हणाले.

एक व्यक्ती म्हणून संगकाराला जाणून घेण्याचा परिपूर्ण आनंद मला घेता आला आणि क्रिकेटमधील तुझे योगदान शब्दात सांगणे कठीण आहे. संगकारा अनेकांचा प्रेरणास्रोत आहे आणि त्यांने दिशादर्शकाची भूमिका बजावली आहे. संगकारासोबत खेळण्याची संधी मिळाली, हे मी भाग्य समजतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
विराट कोहली, भारताचा कर्णधार