भारत-पाक सामन्यादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी ‘स्टार’ने कंपन्यांकडून घेतलेली रक्कम पाहून व्हाल थक्क

चाहत्यांच्या उत्साहाबरोबरच या सामन्याशी संबंधित आणखीन एक गोष्ट शिगेला पोहचलीय ती म्हणजे सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचे दर

India Pakistan Ad
या सामन्यासाठीचे जाहिरातींचे सर्व स्लॉट विकले गेले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. त्यातही तो सामना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील असेल तर उत्साहाबद्दल विचारायलाच नको. चाहत्यांच्या उत्साहाबरोबरच या सामन्याशी संबंधित आणखीन एक गोष्ट शिगेला पोहचलीय आणि ती गोष्ट आहे सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचे दर. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण या सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या दहा सेकंदांच्या जाहिरातींसाठी लाखो रुपये कंपन्या मोजणार आहेत.

स्टार स्पोर्ट्सवर हा सामना लाइव्ह पाहता येणार आहे. २४ तारखेला म्हणजेच येत्या रविवारी होणाऱ्या या सामन्यासाठी स्टार स्फोर्ट्सने जाहिरातींचा दर सर्वाधिक ठेवला आहे. एक्सचेंज फॉर मीडिया या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार भारत पाक सामन्यादरम्यानच्या १० सेकंदांच्या जाहिरातीच्या स्लॉटसाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपये आकारले जाणार आहेत. “या सामन्यादरम्यानच्या जाहिरातींचे स्लॉट विकून झाले आहेत. १० सेकंदांच्या स्लॉटसाठी प्रायोजक कंपन्यांकडून १७ ते १८ लाख रुपये घेण्यात आले आहेत. शेवटच्या क्षणला जाहिराती घेताना हा दर १० सेकंदांसाठी २५ ते ३० लाख इतका होता,” असं या क्षेत्राशी संबंधित एका मीडिया प्लॅनरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

या मालिकेसाठी १४ जाहिरातदार कंपन्या आहेत. यात ड्रीम ११, बायजूज, फोनपे, थम्ब्स, विमल, हेवल्स, जीओमार्ट, नेटमेड्स डॉट कॉम हे को प्रेझेन्टींग स्पॉनसर्स आहेत. तर आकाश, स्कोडा, व्हाइटहॅट जेआर, ग्रेट लर्निंग, कॉइन डीसीएक्स आणि ट्रेण्ड्स हे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत. यापैकी को स्पॉन्सर्सला ६० ते ७० कोटी मोजावे लागले आहेत तर को स्पॉन्सर्सला ३० ते ४० कोटी मोजावे लागलेत.

२४ तारखेपासून भारत या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा २९ दिवस चालणार असून एकूण ४५ सामने या स्पर्धेत होणार आहे. अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईत होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Icc t20 wc star hikes ad rates for india pak match 10sec slot now costs rs 25 30 lakh scsg

Next Story
सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू व्यापार
ताज्या बातम्या