T20 World Cup 2026 Points Table: आयसीसी टी -२ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेवर विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात नामिबियाला धूळ चारली आहे. तर नेपाळ आणि इटली या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात इटलीने १० गडी राखून मोठा विजय मिळवून स्पर्धेतील पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. दरम्यान टी -२० वर्ल्डकपच्या गुणतालिकेत काय बदल झाले आहेत? जाणून घ्या.
भारतीय संघाचा ग्रुप ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतीय संघ २ पैकी २ सामने जिंकून अव्वल स्थानी विराजमान आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे ४ गुणांसह भारतीय संघाचा नेट रनरेट ३.०५० इतका झाला आहे.
पाकिस्तानने देखील या स्पर्धेतील २ पैकी २ सामने. जिंकले आहेत. यासह ४ गुणांची कमाई केली आहे. पण नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा मागे आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट .०९३२ इतका आहे. तर नेडरलँड तिसऱ्या स्थानी आहे . तर अमेरिका आणि नामिबिया अजूनही आपल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.
तर ग्रुप सी मध्ये वेस्ट इंडिजचा संघ अव्वल स्थानी विराजमान आहे. स्कॉटलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर नेपाळला पराभूत करून इटलीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लंडचं टेन्शन वाढलं आहे.
भारतीय संघ आपला पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना १५ फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबोत खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत बदल पाहायला मिळू शकतो. आधी पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला होता. पण अखेर पीसीबीला आयसीसीसमोर झुकावं लागलं आहे. पाकिस्तानने आपला निर्णय बदलला असून, भारत – पाकिस्तान सामना खेळण्यास होकार दिला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान हा सामना जिंकून भारतीय संघाकडे सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे.

