Srilanka vs Pakistan Highlights: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानकडे नामी संधी होती. पण पाकिस्तानने ही संधी गमावली आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानने विजय तर मिळवला, पण नेट रनरेटमुळे पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी २१३ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी श्रीलंकेला १४८ धावांवर थांबवणं गरजेचं होतं. श्रीलंकेने १४७ धावांचा पल्ला गाठून पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर केलं. तर पाकिस्तानने हा सामना ५ धावांनी आपल्या नावावर केला.

Live Updates

Sri Lanka vs Pakistan : श्रीलंका विरूद्ध पाकिस्तान सामन्याचे हायलाईट्स.

23:03 (IST) 28 Feb 2026

SL vs PAK Live: श्रीलंकेचा दमदार विजय

पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी २१३ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी श्रीलंकेला १४८ धावांवर थांबवणं गरजेचं होतं. श्रीलंकेने १४७ धावांचा पल्ला गाठून पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर केलं. तर पाकिस्तानने हा सामना ५ धावांनी आपल्या नावावर केला.

21:13 (IST) 28 Feb 2026

SL vs PAK Live: श्रीलंकेला पहिला मोठा धक्का! पथुम निसांका स्वस्तात परतला माघारी

श्रीलंकेला पहिला मोठा धक्का बसला आहे. पथुम निसांका अवघ्या ३ धावा करून माघारी परतला आहे.

20:54 (IST) 28 Feb 2026

SL vs PAK Live: साहिबजादाचं दमदार शतक! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी श्रीलंकेला किती धावांवर रोखावं लागणार?

साहिबजादा फरहानच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने २० षटकांअखेर ८ गडी बाद २१२ धावा केल्या आहेत. जर पाकिस्तानला हा सामना जिंकायचा असेल, तर १५० हून कमी धावांवर रोखावं लागणार आहे.

20:39 (IST) 28 Feb 2026

SL vs PAK Live: साहिबजादा फरहानचं शतक पूर्ण

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना साहिबजादा फरहानची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने ५९ चेंडूत शतक पूर्ण केलं आहे.

20:26 (IST) 28 Feb 2026

SL vs PAK Live: पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का! फखर जमाननंतर नफाय परतला माघारी

पाकिस्तानला चांगली सुरूवात मिळाली होती. पण १७ व्या षटकात दुसरा मोठा धक्का बसला आहे. नफाय बाद होऊन माघारी परतला आहे.

20:13 (IST) 28 Feb 2026

PAK vs SL Live: साहिबजादा- फखरची तुफान फटकेबाजी! पाकिस्तान मजबूत स्थितीत

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या साहिबजादा- फखर यांनी तुफान फटकेबाजी करून दमदार सुरूवात करून दिली आहे. पाकिस्तानने १५० धावांचा पल्ला गाठला आहे.

19:50 (IST) 28 Feb 2026

SL vs PAK Live: पाकिस्तानच्या १०० धावा पूर्ण

पाकिस्तानला जशी हवी होती तशीच सुरूवात मिळाली आहे. पाकिस्तानने सुरूवातीच्या १० षटकात फलंदाजी करताना १०० धावांचा पल्ला गाठला आहे.

19:45 (IST) 28 Feb 2026
SL vs PAK Live: साहिबजादा फरहानचं दमदार अर्धशतक! पाकिस्तान मजबूत स्थितीत

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना साहिबजादा फरहानने ३२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

19:34 (IST) 28 Feb 2026

SL vs PAK Live: पावरप्लेमध्ये पाकिस्तानची दमदार सुरूवात

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने दमदार सुरूवात केली आहे. ६ षटकात पाकिस्तानने ६४ धावा केल्या आहेत.

18:38 (IST) 28 Feb 2026

SL vs PAK Live: श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या प्लेईंग ११ मधून बाबर आझमला बाहेर करण्यात आलं आहे.

pakistan cricket team

Sri Lanka vs Pakistan: श्रीलंका विरूद्ध पाकिस्तान सामन्याचे हायालाईट्स.