Pakistani fans sell tractor for IND vs PAK Match tickets : रविवारी भारताने आपल्या ११९ धावांच्या कमी धावसंख्येचा बचाव करत पाकिस्तानवर ६ धावांनी पराभव दिला. यासह भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह त्यांचे चार गुण आहेत. त्याचबरोबर भारताचा नेट रन रेटही १.४५५ झाला आहे. याशिवाय चालू स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बाबर आझमच्या संघाला अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडता आलेले नाही. आता पाकिस्तानी चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ट्रॅक्टर विकून सामना पाहायला आला होता, असे सांगताना निराशा झाला आहे.

पाकिस्तानी चाहत्याने तिकीटासाठी विकला ट्रॅक्टर –

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये पाकिस्तानच्या एका चाहता आपला ट्रॅक्टर विकून मॅचचा आनंद लुटण्यासाठी आला होता. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने सांगितले की, या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी त्याने आपला ट्रॅक्टर तीन हजार डॉलरला विकला होता. चाहत्याने सांगितले की जेव्हा त्याने भारताची धावसंख्या पाहिली तेव्हा त्याला वाटले की आपण तिकीटासाठी ट्रॅक्टर विकल्याचे सार्थक होईल. परंतु भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत पाकिस्तानी चाहत्याच्या आशा धुळीस मिळवल्या. यानंतर चाहत्यांने पाकिस्तान संघाला अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

काय घडलं मॅचमध्ये?

टी-२०- विश्वचषक २०२४ चा १९ वा सामना रविवारी कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने १९ षटकांत १० गडी गमावून ११९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून ११३ धावाच करू शकला. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीमुळे रोहित शर्माच्या सेनेने सामना सहा धावांनी जिंकला. या सामन्यात वेगवान गोलंदाजाने एकूण तीन विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ३.५० च्या इकॉनॉमी रेटने केवळ १४ धावा दिल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. यापूर्वी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात बुमराहने पाकिस्तानविरुद्ध १९ धावांत दोन विकेट्स घेतल्या होते आणि तोच सामनावीर ठरला होता.

हेही वाचा – IND vs PAK : भारताविरुद्धच्या पराभवानंतर नसीम शाहला अश्रू अनावर, रोहित शर्माने दिला धीर, पाहा VIDEO

टीम इंडियाने सर्वात लहान धावसंख्येचा केला यशस्वी बचाव –

टी-२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. या बाबतीत भारताने श्रीलंकेची बरोबरी केली. दोघांनी १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला आहे. श्रीलंकेने २०१४ च्या टी-२० विश्वचषकात चितगाव येथे न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्याच वेळी, भारतीय संघाने टी-२० मध्ये यशस्वी बचाव केलेली ही सर्वात लाहन धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता.