Angelo Matthews Apologized To Sri Lanka: श्रीलंका संघाने टी-२० विश्वचषक २०२४ मधील गट फेरीतून बाहेर पडला आहे. २०१४ नंतर श्रीलंका संघ पुढील फेरीत जाऊ शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर अँजेलो मॅथ्यूजने शनिवारी आपल्या संघसहकाऱ्यांच्या वतीने श्रीलंकेची माफी मागितली आणि सांगितले की “संपूर्ण देशाला निराश केले” आहे. गुरुवारी सेंट व्हिन्सेंटमध्ये बांगलादेशने नेदरलँड्सचा पराभव केल्याने टी-२० विश्वचषक २०२४च्या गट-टप्प्यातून बाहेर पडला आहे.

श्रीलंकेने टी-२० विश्वचषकातील त्यांचे दोन्ही सामने गमावले. न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि डॅलासमध्ये बांगलादेशविरुद्धचा संघाने गमावला आणि मंगळवारी फ्लोरिडामध्ये नेपाळविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. यासह श्रीलंकेचा संघ टी-२० विश्वचषक २०२४ मधून बाहेर पडला. संघ गेल्या दशकभरात टी-२० विश्वचषकाच्या पुढील फेरीत पोहोचू शकलेला नाही. याबाबत श्रीलंका संघाचा सर्वात वरिष्ठ खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याने माफी मागितली आहे

Hardik Pandya pulled out of ODI series
IND vs SL : टीम इंडियाला मोठा धक्का! श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून हार्दिक पंड्या बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण?
euro 24 england vs netherlands match prediction
इंग्लंडला कामगिरीत सुधारणेची आस; आज नेदरलँड्सविरुद्ध उपांत्य लढत; प्रमुख खेळाडू चमकण्याची गरज
Sanath Jayasuriya, sri lanka head coach
श्रीलंकेच्या संघाला सावरणार ‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू, भारताविरूद्धच्या मालिकेपासून स्वीकारणार हेड कोचचा पदभार
Taskin Ahmed was punished for sleeping
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी झोपणं बांगलादेशच्या खेळाडूला पडलं महागात, संघाने दिली मोठी शिक्षा, आता मागतोय माफी
Rohit Sharma takes a bite of Barbados pitch after T20 World Cup win
IND vs SA Final: रोहित शर्माने विजयानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव का चाखली? VIDEO मध्ये पाहा कॅप्टनने नेमकं काय केलं?
IND vs SA Final Highlights T20 World Cup 2024 Updates in Marathi
IND vs SA Final Highlights : सूर्यकुमार यादवचा झेल ठरला निर्णायक! टीम इंडियाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
IND vs BAN Highlights Score T20 World Cup 2024 Updates in Marathi
IND vs BAN Highlights, T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा बांगलादेशवर विजय; सेमी फायनलच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल

“आम्ही संपूर्ण देशाला निराश केले आहे आणि यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो कारण आम्ही स्वतःला निराश केले आहे. आम्हाला अशा निकालाची अपेक्षा कधीच नव्हती,” मॅथ्यूज म्हणाला. “आम्ही अनेक आव्हानांचा सामना केला पण त्या फार काळजी करण्यासारख्या नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे की आम्ही दुसरी फेरी गाठू शकलो नाही.”

हेही वाचा – IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”

रविवारच्या सामन्यापूर्वी मॅथ्यूज म्हणाला, “आम्ही कोणत्याही संघाला साधारण समजू शकत नाही. “काल नेपाळने दक्षिण आफ्रिकेला जवळपास हरवताना आपण पाहिले. आमचा नेपाळविरूद्धचा सामना रद्द झाला हे दुर्दैवी होतं, पण जे आहे ते असंच आहे. आमच्याकडे स्पर्धेत अजून एकच सामना बाकी आहे आणि आम्ही आमच्या अभिमानासाठी खेळू.

“आम्ही चांगली कामगिरी केली नाही, विशेषत: आम्ही पहिल्या दोन सामन्यांमध्ये ज्या प्रकारे खेळलो,जे खूप दुर्दैवी होते. आम्ही दु:खी आहोत, आणि आम्ही स्वतः खूप दुखावलो आहोत. पण उद्याचा आणखी एक दिवस आमच्याकडे आहे आणि उद्या नेदरलँड्सविरूद्ध सामना आहे. नेदरलँड्स एक अतिशय धोकादायक संघ आहे, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करू आणि त्यांना पराभूत करू.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

डिसेंबरपासून सलग तीन टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रीलंका टी-२० विश्वचषक स्पर्धेत उतरला. यावर मॅथ्यूज म्हणाला, “आम्ही ज्याप्रकारे अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि बांगलादेशविरूद्ध खेळलो त्यावरून मला वाटते की आम्ही या स्पर्धेत आमच्या क्षमतेला साजेशी कामगिरी केली नाही, याची मला खंत आहे.

“जेव्हा तुम्ही विश्वचषक खेळत असता तेव्हा तुम्ही कोणत्याही संघाला साधारण समजू शकत नाही. पण दुर्दैवाने, विश्वचषकापूर्वी आम्ही त्या संघांविरुद्ध ज्या प्रकारे खेळलो आणि त्यानंतर आम्ही विश्वचषकात ज्या प्रकारे खेळलो, सहाजिकच खेळपट्टी वेगळी होती पण आम्ही स्वतःला न्याय दिला नाही.”

हेही वाचा – IND vs CAN: द्रविड गुरुजींची कॅनडा ड्रेसिंगरुमला सरप्राईज व्हिजिट; जिंकली मनं; पाहा VIDEO

३७ वर्षीय मॅथ्यूजने अजूनही त्याच्या व्हाईट-बॉलच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल कोणतेही कठोर निर्णय घेतले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून तो कसोटी संघात सातत्याने खेळत आहे, परंतु सध्याच्या निवड समितीने त्याला मर्यादित षटकांच्या संघातून वगळण्यात आले होते.

मॅथ्यूज म्हणाला, “मी प्रत्येक सामना माझा शेवटचा सामना असल्यासारखा खेळतो. आयुष्यात काहीच निश्चित नसतं. मी संघासाठी जे काही करू शकतो ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला पुढच्या सामन्याबद्दल किंवा पुढील मालिकेबद्दल फारशा आशा नाहीत. माझ्याकडे या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी थोडा वेळ आहे. माझ्या बाजूने मी निर्णय घेतलेला नाही, माझ्यापेक्षा मी क्रिकेटप्रति असलेल्या प्रेमासाठी खेळतो आहे.