AFG vs AUS Highlights, T20 World Cup 2024 : अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियावर मात करत इतिहास रचला आहे. रशीद खानच्या नेतृत्वाखालील या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये तो विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण मॅक्सवेलने त्याच्याकडून विजय हिसकावून घेतला. मात्र, यावेळी अफगाणिस्तानने अशी कोणतीही चूक केली नाही आणि किंग्सटाउन येथे ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. या अफगाणिस्तानच्या विजयाचा खरा शिल्पकार गुलबदीन नईब ठरला .

दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळले गेले आहेत. एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधीही जिंकू शकला नाही, मात्र टी-२०च्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या होत्या. रहमानउल्ला गुरबाजने ६० आणि इब्राहिम झाद्रानने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२. षटकांत १२७ धावांवर गारद झाला.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
IND beat BAN by 50 Runs
IND v BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, या विजयासह टीम इंडियाने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”
ind vs aus t 20 cricket world cup 2024 super 8 match
Ind vs Aus T20 WC: सेमीफायनलचं गणित आकड्यांमध्ये अडकलं; भारतही पडू शकतो बाहेर, वाचा काय आहे नेमकं सूत्र!
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक ठरले व्यर्थ –

ग्लेन मॅक्सवेल (५९) व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला १५ चा आकडा देखील स्पर्श करता आला नाही. ट्रॅव्हिस हेड (०), डेव्हिड वॉर्नर (३), कर्णधार मिचेल मार्श (१२), मार्कस स्टॉइनिस (११), टीम डेव्हिड (२), मॅथ्यू वेड (५), पॅट कमिन्स (३), ॲश्टन अगर (२) आणि ॲडम झाम्पा (९) विशेष काही करू शकला नाही. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे सुपर ८ गट १ मधील उपांत्य फेरी गाठण्याची लढाई रोमांचक झाली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोघांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला आपला शेवटचा सुपर ८ सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. दोघेही हरले तर नेट रन रेटचा खेळ रंगेल.

हेही वाचा – T20 WC 2024 : “विराट आधी केलेल्या चुका…”, कोहलीच्या ‘फ्लॉप’ फॉर्मवर नवज्योत सिंग सिद्धूचे मोठे वक्तव्य

पॅट कमिन्सने सलग सामन्यात हॅट्ट्रिक घेत रचला इतिहास –

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या. एकवेळ अफगाणिस्तान संघाने एकही विकेट न गमावता ११८ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर ३० धावा करताना संघाने सहा विकेट गमावल्या. पॅट कमिन्सने इतिहास रचला आहे. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली. याआधी कमिन्सने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. आता अफगाणिस्तानविरुद्ध त्याने सलग तीन विकेट घेतल्या. डावाच्या १८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमिन्सने रशीद खानला बाद केले. यानंतर २० व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर करीम जनात आणि गुलबदिन नईब बाद झाले. टी-२० विश्वचषकात दोन हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू आहे.

हेही वाचा – T20 WC 2024 : पंतची गिलख्रिस्टशी तुलना करण्यावर माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याच्यासारखा बनण्यासाठी पंतला अजून…’

दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तान संघ जिंकता जिंकता राहिला होता –

अॅडलेड ओव्हल या घरच्या मैदानावर खेळतानाही २०२२ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानविरुद्ध त्रेधातिरपीट उडाली होती. ऑस्ट्रेलियाने तो सामना अवघ्या ४ धावांनी जिंकला होता. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने ३२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५४ धावांची दिमाखदार खेळी केली. मिचेल मार्शने ३० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. मार्कस स्टॉइनस आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी २५ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नवीन उल हकने ३ तर फझलक फरुकीने २ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणिस्तानने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रहमनुल्ला गुरबाझने ३० धावा केल्या. गुलबदीन नईबने २३ चेंडूत ३९ धावांची वेगवान खेळी केली होती. रशीद खानने २३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४८ धावा करत विजयश्री मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तो अपुरा ठरला. ३२ चेंडूत ५४ धावा करणाऱ्या मॅक्सवेललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हेही वाचा – IND vs BAN : रोहित शर्माने रचला इतिहास! ख्रिस गेलचा ‘हा’ षटकारांचा विक्रम मोडत ठरला नवा ‘सिक्सर किंग’

वानखेडेवर मॅक्सवेल उभा ठाकल्याने अफगाणिस्तानचं स्वप्न धुळीस मिळालं होतं –

वनडे वर्ल्डकपदरम्यान अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना क्रिकेटविश्वातल्या अद्भुत आणि अविश्वसनीय सामन्यांमध्ये गणला जातो. वानखेडे स्टेडियमवर फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर अफगाणिस्तानने इब्राहिम झाद्रानच्या १२९ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर २९१ धावांची मजल मारली. झाद्रानने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ही खेळी सजवली. रशीद खान (३५) आणि रहमत शाह (३०) यांनी उपयुक्त खेळी केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली आणि त्यांची अवस्था ९१/७ अशी होती. प्रचंड उकाडा, आर्द्रता आणि पायात येणारे गोळे या प्रतिकूल गोष्टींना पुरुन उरत ग्लेन मॅक्सवेलने अचंबित करणारी खेळी साकारली. अनेकदा वैद्यकीय उपचार घ्यावे लागलेल्या मॅक्सवेलने तीन जीवदानांचा फायदा उठवत २१ चौकार आणि १० षटकारांसह नाबाद २१० धावांची खेळी साकारली. कमिन्सने ६८ चेंडूत १२ धावांची चिवट साथ दिली. मॅक्सवेलला या थरारक खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.