Pakistani Cricketer Azam Khan: पाकिस्तान संघाची टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुरूवात फारच निराशाजनक झाली आहे. तसेच टी-२० विश्वचषकापूर्वीच्या तयारीतही संघाच्या हाती निराशा आली. वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, जिथे त्यांनी ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळली, ज्यात पाकिस्तानने मालिका गमावली. तर अमेरिकेविरूद्ध सामन्यात सुपर ओव्हरमध्ये लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यादरम्यानच पाकिस्तानच्या संघातील खेळाडू बाबर आझम याला ट्रोल केले जात आहे. गेल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये तो भोपाळा घेऊन माघारी परतला. यासोबतच त्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. पण हा आझम खान नेमका कोण आहे, जाणून घ्या.

कोण आहे पाकिस्तानचा वजनदार खेळाडू आझम खान?

पाकिस्तानचा २५ वर्षीय क्रिकेटपटू आझम खान हा त्याच्या फिटनेसमुळे आणि त्याचसोबत त्याच्या कामगिरीमुळेही चर्चेचा विषय ठरला आहे. सुमारे ११० किलो वजन असलेला आझम २०२४ च्या टी-२० विश्वचषकात सहभागी होणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक भाग आहे. २५ वर्षीय आझम हा यष्टिरक्षक फलंदाज असून जोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची ओळख इथेच संपत नाही. आझम हा पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक मोईन खानचा मुलगा आहे. वडिलांमुळेच त्याला पाकिस्तान संघात स्थान मिळाले आहे, असा आरोप अनेकदा केला जातो. मोईन खान हा एक उत्कृष्ट खेळाडू होता, ज्याने पाकिस्तानचे कर्णधारपदही भूषवले आहे आणि त्याचसोबत तो एक चतुर फिनिशर म्हणूनही प्रसिद्ध होता.

talibani rules afghanistan
संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
Sunil Gavaskar 75th Birthday Special Straight bat game
सरळ बॅटीचा खेळ…
Virat Kohli and Rohit Sharma Future Plans following their retirement from T20 internationals
विराट कोहली, रोहित शर्मा आता टी २० मधून निवृत्ती घेतल्यावर पुढे काय करणार? कशी असेल हुकमी एक्क्यांची पुढची खेळी?
Why is Rohit Sharma Twenty20 career important
अखेर जगज्जेता! रोहित शर्माची ट्वेन्टी-२० कारकीर्द का ठरते खास?
sorry bhaiya logo ko rishabh pant shares hilarious video of ms dhoni virat kohli and rohit sharma dancing video goes viral t20 world cup 2024
धोनी, कोहली अन् रोहितने ‘बरसो रे मेघा’ गाण्यावर धरला ठेका; ऋषभ पंतने पोस्ट केला मजेशीर video, पाहून हसू आवरणे होईल कठीण
Raj Rajaratnam and the scam happen with Goldman Sachs in year 2009 in US
वित्तरंजन : नीतिमत्ता वेशीवर टांगणारा – राज राजरत्नम
Ian Smith's reaction to Rishabh Pant
T20 WC 2024 : पंतची गिलख्रिस्टशी तुलना करण्यावर माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याच्यासारखा बनण्यासाठी पंतला अजून…’
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

पाकिस्तान सुपर लीगमधील शानदार कामगिरीनंतर जुलै २०२१ मध्ये नॉटिंगहॅममध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आझमने पदार्पण केले. पीएसएलमध्ये ठळकपणे आपले नाव कमावत असताना, आझमने १४६ च्या स्ट्राईक रेटने ११० टी-२० सामन्यांमध्ये २४६५ धावा केल्या. त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. विस्फोटक फलंदाजीसाठी अशी ओळख असणारा आझम खान पाकिस्तानकडून टी-२० मध्ये आतापर्यंत १३ डाव खेळूनही अद्याप त्याच्या १०० धावाही पूर्ण करू शकला नाही. ३०* च्या सर्वोच्च स्कोअरसह, त्याने अद्याप राष्ट्रीय संघासाठी केवळ ८८ धावा केल्या आहेत.

गेल्या १३ डावांमध्ये आझमची कामगिरी ढासळलेली असतानाही त्याला इंग्लंड दौऱ्यासह टी-२० विश्वचषकातही संधी दिली. इंग्लंड दौऱ्यावर आझम बॅटने फेल ठरला आणि गोल्डन डकवर बाद झाला. याचसोबत यष्टीरक्षण करतानाही त्याने काही सोपे झेल सोडले. असं असतानाही त्याला टी-२० वर्ल्डकप संघात आणि प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी का देण्यात आली यावर टीका सुरू आहे. यासोबतच त्याच्या स्थूलपणावरही भाष्य केले जात आहे त्याला अगदी सर्रास त्याच्या स्थूलपणावरून चिडवले जात आहे.

हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल

आझमच्या कामगिरीवर टीका

टी-२० विश्वचषक संघातील त्याच्या स्थानावर टीकाकार आवाज उठवत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने तर फिटनेसच्या निकषांवर मी आझमला संघाच्या जवळही येऊ देणार नाही, असे म्हटले आहे. आफ्रिदी म्हणाला की, आझमची फटकेबाजी उत्कृष्ट आहे पण वेस्ट इंडिजच्या संथ खेळपट्टीवर चेंडू खाली असेल. अशा स्थितीत यष्टिरक्षक म्हणून त्याला खाली वाकून चेंडू पकडण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. केवळ आफ्रिदीच नाही तर आझम त्याच्या खराब फिटनेसमुळे आणि वजनदार शरीरयष्टीमुळे पाकिस्तानी चाहत्यांसाठी विनोदाचा विषय बनला आहे.

आझम खानने पैशांनी पुसला घाम


पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना आझम खानचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये आझम खान टीम बसमध्ये बसून नोटांनी घाम पुसताना दिसत आहेत. यादरम्यान मागे बाबर आझमचा आवाज ऐकू येतो. व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा कर्णधार आझम खानला विचारतो, ‘काय झालं…? गर्मी आहे…?’ यावर उत्तर देताना आझम खान नोटांनी घाम पुसत खूप गर्मा आहे असं म्हणतो आणि मागून सगळे हसू लागतात.

अमेरिकेविरूद्ध सामन्यानंतर ट्रोल

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आझम खानचा समावेश होता. अमेरिकेविरुद्ध आझम फलंदाजीला आल्यावर खाते न उघडताच बाद झाला. यानंतर आझम खानची सोशल मीडियावर खिल्ली उडवायला सुरुवात झाली. पोस्ट शेअर करताना एका यूजरने लिहिले की, त्याला भूक लागली म्हणून तो शून्यावर बाद झाला. या पोस्टमध्ये यूजरने आझम खानचा फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा – T20 WC 2024 : रोहित शर्माचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! आजपर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम

आझम गोल्डन डकवर बाद झाल्यावर भडकला

अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाल्यावर आझम ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना, स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या काही कमेंटमुळे तो अचानक संतापला. यानंतर आझमने त्या सर्व चाहत्यांकडे रागाने पाहिले आणि नंतर हाताने काही हावभाव केले. आझम खानच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.