Team India playing volleyball on the beach of Barbados : टीम इंडियाने शानदार कामगिरीच्या जोरावर टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. प्लेइंग इलेव्हनबाबत सर्वत्र चर्चा आहे, पण खेळाडू या मुद्द्यांपासून कोसो दूर आहेत. विराट कोहली ज्याच्या फ्लॉप शोमुळे सगळ्यांचे टेन्शन वाढले आहे. मात्र बाद फेरीपूर्वी कोहली कोणत्याही प्रकारच्या टेन्शनशिवाय बीचवर टीम इंडियासोबत व्हॉलीबॉलचा आनंद घेताना दिसला. असे अनेक खेळाडूही या खेळात उतरले आहेत ज्यांना अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. हा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये टीम इंडिया दोन गटात विभागली गेली आहे. बार्बाडोसच्या समुद्रकिनाऱ्यावर खेळाडू एन्जॉय करताना दिसले, विशेषत: विराट कोहली आणि रिंकू सिंग यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रोहित शर्मा, विराट कोहली, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, युजवेंद्र चहल आणि अगदी संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीपही आपल्या क्रीडा कौशल्याने सर्वांना प्रभावित करताना दिसले. विशेषतः विराट, रिंकू, अर्शदीप आणि हार्दिकने शर्टलेस होऊन खेळताना दिसले.

, Shamar Joseph six video
ENG vs WI 2nd Test : शमर जोसेफच्या षटकराने प्रेक्षक गॅलरीचे तुटले छत, चाहते थोडक्यात बचावले, VIDEO व्हायरल
copa america 2024 final argentina vs colombia match prediction
Copa America 2024 : तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाला संधी; कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचे आव्हान
Andre Russells six hit video viral
MLC 2024: विराटनंतर रसेलनेही हरिस रौफला दाखवले तारे, ३५१ फूट उंच मारलेल्या षटकाराचा VIDEO व्हायरल
Vande Mataram Singing Plan Video Viral
Victory Parade : विराट कोहलीने आधीच योजना बनवली होती का? ‘वंदे मातरम’ गाण्यापूर्वीचा VIDEO आला समोर
Virat Kohli Meets Childhood Rajkumar Sharma Coach photo viral
Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल
Sreesanth Slams Riyan Parag For Not Supporting India In T20 World Cup 2024
“आधी देशभक्त हो…”, रियान परागच्या वादग्रस्त वक्तव्यावर श्रीसंत संतापला; पण नेमकं काय घडलं?
MS Dhoni New Haircut Photos Viral
माहीच्या नव्या ‘हेअर स्टाइल’ने वेधले सर्वांचे लक्ष; व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘काही दिवसात तो ४३ वर्षांचा होईल यावर…’
sorry bhaiya logo ko rishabh pant shares hilarious video of ms dhoni virat kohli and rohit sharma dancing video goes viral t20 world cup 2024
धोनी, कोहली अन् रोहितने ‘बरसो रे मेघा’ गाण्यावर धरला ठेका; ऋषभ पंतने पोस्ट केला मजेशीर video, पाहून हसू आवरणे होईल कठीण

टीम इंडिया व्हॉलीबॉल खेळतानाचा व्हिडीओ –

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत सामने १९ जूनपासून सुरू होत आहेत. टीम इंडिया २० जूनला अफगाणिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुपर ८ सामने होणार असून तेथे फिरकीपटूंना अधिक महत्त्व आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या संघात तीन फिरकीपटू दिसू शकतात. त्याचबरोबर काही खेळाडूंना बाहेरही व्हावे लागेल.

हेही वाचा – BAN vs NEP सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा, लाइव्ह सामन्यात दोन खेळाडू एकमेकांना भिडले, धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल

सुपर ८ फेरीत विराट कोहलीवर सर्वांचे लक्ष –

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली ग्रुप स्टेज सामन्यांत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याला ओपनिंगची भूमिका देण्यात आली होती पण ३ पैकी एकाही सामन्यात तो फार काळ टिकू शकला नाही. किंग कोहलीने ३ सामन्यात ४, १, ० धावा करून सर्वांची निराशा केली. टी-२० विश्वचषकातील बाद फेरीतील कोहलीचे आकडे उत्कृष्ट असल्याने सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील.

हेही वाचा – Rishabh Pant : राहुल-गोयंकांच्या वादावादीच्या व्हिडीओवर ऋषभ पंतचं भाष्य; म्हणाला, “मलाही अनेकदा…”

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग आणि खलील अहमद.