Canadian Rapper Orbe Drake Graham bet on IND vs PAK Match : तुम्ही कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेकचे नाव विसरला नसेल. हा तोच रॅपर आहे ज्याने आयपीएल २०२४ च्या फायनल सामन्यावर मोठा सट्टा लावला होता. आता ड्रेकने पुन्हा एकदा एका मोठ्या सामन्यावर सट्टा लावला आहे. ड्रेकने टी-२० विश्वचषक २०२४ मधील रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर मोठा सट्टा लावला आहे. अलीकडेच ड्रेकने आयपीएल फायनलमध्ये केकेआरवर सट्टा लावून मोठी रक्कम जिंकली होती. आता पाकिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी पुन्हा लकी ठरतो की नाही हे पाहायचे आहे.

केकेआरच्या विजयाने ४.५ कोटी जिंकणारा कोण आहे हा गायक?

ऑर्बे ड्रेक ग्रॅहम असे या गायकाचे नाव आहे. तो कॅनेडियन रॅपर, गायक आणि अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनय आणि संगीतामुळे त्याने अनेक ग्रॅमी पुरस्कारही जिंकले आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर ड्रेकने सट्टा लावला होता. केकेआरच्या विजयावर ड्रेकने अडीच कोटींचा सट्टा लावली होता. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन झाल्यानंतर ड्रेक ४.३कोटी रुपये जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

Shubman Gill has no idea about captaincy
Shubman Gill : शुबमनच्या नेतृत्त्वावर अमित मिश्राने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘त्याला कर्णधारपदाबद्दल काहीच माहिती नाही…’
Kamran Akmal and Harbhajan Singh Video viral
WCL 2024 : शीख धर्माबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कामरान अकमल-हरभजन सिंग आमनेसामने, VIDEO व्हायरल
Taskin Ahmed was punished for sleeping
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी झोपणं बांगलादेशच्या खेळाडूला पडलं महागात, संघाने दिली मोठी शिक्षा, आता मागतोय माफी
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Loksatta explained Who will win the India vs South Africa final in Twenty20 World Cup cricket tournament
भारत वि. दक्षिण आफ्रिका…दोन्ही संघ ठरवले गेले ‘चोकर्स’…अंतिम फेरीत बाजी कोणाची?
Rohit Sharna
IND vs ENG : “एका क्षणी असं वाटलेलं…”, रोहित शर्माने व्यक्त केली भीती; इंग्लंडवरील विजयाबद्दल म्हणाला…
Rohit Sharma Statement on India Win and Playing XI
IND v AFG: भारताच्या विजयानंतर प्लेईंग इलेव्हनवर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला; भविष्यातील सामन्यांमध्ये तीन गोलंदाज….
Ashwin Reacts On Virat Kohli Playing at Number 3
“विराट कोहली म्हणेल, तुम्ही मला खाली आणलंत, आता..”,अश्विनने सांगितला टीमच्या क्रमवारीत बदल केल्यास होणारा परिणाम

ड्रेक जिंकला तर इतके पैसे मिळतील –

भारताच्या विजयावर कॅनडाच्या गायाकाने मोठा सट्टा लावला आहे. ड्रेकने रविवारच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताच्या विजयावर $6,50,000 चा सट्टा लावला आहे. आणि भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ५.४२ कोटी रुपये आहे. जर ड्रेकने हा सट्टा जिंकला तर त्याला $9,10,000 म्हणजेच सुमारे ७.६ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. म्हणजे भारत जिंकताच ड्रेक मालामाल होणार आहे. आता रविवार ड्रेकसाठी लकी दिवस ठरतो की नाही ते बघूया.

हेही वाचा –IND vs PAK : ‘बाबरची कोहलीच्या पायताणाचीही लायकी नाही’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूची टोकदार भाषेत टीका

का लावला इतक्या कोटीचा सट्टा?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडाच्या गायकाने भारत-पाकिस्तानमधील मॅच रेकॉर्ड लक्षात घेऊन हा सट्टा लावला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेल्या टी-२० सामन्याकडे पाहता ड्रेकने हा सट्टा भारताच्या विजयावर लावला आहे. क्रिकेटशिवाय ड्रेक फुटबॉल, बास्केटबॉल आणि रग्बी यांसारख्या खेळांवरही सट्टा खेळतो. विशेष म्हणजे ऑर्बे ड्रेकने सट्टेबाजीत कोट्यवधी रुपये जिंकले आहेत, तर त्याला खूप नुकसानही सहन करावे लागले आहे. २०२२ मध्ये यूएफसी लढतीत (अल्टीमेट फाइटिंग चॅम्पियनशिप) इस्रायल अदेसान्या आणि ॲलेक्स परेरा यांच्यातील लढतीवर ड्रेकने दोन मिलियनचा सटा लावला होता. या लढतीत ड्रेकचे आकलन चुकीचे ठरले आणि त्याने आपले सर्व पैसे गमावले.

हेही वाचा – T20 WC 2024: आफ्रिकेला डेव्हिड मिलरने तारलं; नेदरलॅंड्स विरूध्द निसटता विजय

काय असतो सट्टा?

सट्टा हा जुगाराचा एक प्रकार आहे. शॉर्टकटमध्ये पैसे कमवण्यासाठी लोक संघ किंवा खेळाडूवर सट्टा लावतात. त्याचा निर्णय इतर संघाच्या किंवा खेळाडूच्या विजय किंवा पराभवावर अवलंबून असतो. अनेक देशांनी जुगार खेळण्यावर बंदी घातली आहे, तर अनेक देशांमध्ये तो कायदेशीर आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात लोक ऑनलाइन बेटिंगचा अवलंब करत आहेत. हा देखील एक प्रकारचा जुगारच आहे. भारत सरकार अशा गोष्टींवर सतत नियंत्रण ठेवते. जेणेकरून या प्रकारच्या जुगाराला कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन मिळू नये.