टी-२० विश्वचषक २०२२ मधील २० वा सामना आयर्लंड विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारी पार पडला. या सामन्यात आयर्लंडने बलाढ्य इंग्लंड संघाचा ५ धावांनी पराभव केला. आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बलबर्नीने ६२ धावांची शानदार खेळी साकारली, त्यादरम्यान एक मजेदार घटना घडली. ही घटना मेलबर्न क्रिकेट मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याशी संबंधित आहे.

कॅच पकडताना फॅन पडला: खरं तर, सॅम कुरनच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आयरिश कर्णधार बलबर्नीने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा षटकार मारला. यादरम्यान सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेला एक चाहता कॅच पकडण्यासाठी उत्सुक दिसत होता. या प्रयत्नात तो अचानक समोर असलेल्या खुर्च्यांमध्ये तोंडावर पडला. त्यावेळी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. आता हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल

एकीकडे ही मजेशीर घटना कॅमेऱ्यात कैद झाली. तर दुसरीकडे काही वेळाने हा क्रिकेट चाहताही या आपल्या स्वतःसोबत घडलेल्या अपघातावर हसताना दिसला. या दरम्यान महत्वाचे म्हणजे चाहत्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्याचबरोबर तिथे उपस्थित असलेल्या इतर प्रेक्षकांनी त्या चाहत्याला सावरण्यासाठी मदत केली.

डकवर्थ लुईस नियमानुसार आयरिश संघ ५ धावांनी विजयी घोषित –

इंग्लंड आणि आयर्लंड सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर इंग्लिश कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आयर्लंडने स्कोअरबोर्डवर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडने आपल्या सुरुवातीच्या विकेट लवकर गमावल्या होत्या, त्यानंतर इंग्लिश १४.३ षटकांत ५ विकेट गमावून केवळ १०५ धावाच करू शकला. पावसामुळे सामना पुढे खेळता आला नाही, त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार आयरिश संघ ५ धावांनी विजयी घोषित करण्यात आला.

हेही वाचा – T20 World Cup: अक्षर पटेलची फलंदाजीतील क्रमवारी निश्चित नाही, संघ व्यवस्थापनाने सांगितली त्याची भूमिका