Australia beat Scotland by 5 wickets : टी-२० विश्वचषक २०२४ च्या ३५ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा ५ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा फायदा इंग्लंडला झाला. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकताच इंग्लंडने सुपर-८ मध्ये स्थान पक्के केले. ज्यामुळे स्कॉटलंडचे सुपर-८ मध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने १८१ धावांचे लक्ष्य दिले होते, जे ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात १९.४ षटकांत पार केले. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वात मोठी खेळी खेळली. या सामन्यात मार्कस स्टॉइनिसने त्याला चांगली साथ दिली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकात ५ गडी गमावत १८० धावा केल्या. स्कॉटलंड संघासाठी ब्रँडन मॅकमुलेनने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ३४ चेंडूचा सामना करताना २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही विशेष नव्हती. त्यामुळे स्कॉटलंड सामना जिंकून मोठा उलटफेर करत विजय खेचून आणेल असे वाटत होते, पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टॉइनिस जोडीने तसे होऊ दिले नाही.

हेड-स्टॉइनिसच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला नवसंजीवनी दिली –

पहिल्या काही विकेट लवकर पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टॉइनिस यांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला नवसंजीवनी दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८० धावांची (४४ चेंडू) भागीदारी केली, ज्यामुळे सामना मोठ्या प्रमाणावर ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळला, जो एकेकाळी त्यांच्या हाताबाहेर गेला होता. ऑस्ट्रेलियाने २ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. ट्रॅव्हिस हेडने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर मार्कस स्टॉइनिसने त्याला साथ देताना २९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार मारत ५९ धावा केल्या.

हेही वाचा – T20 WC 2024 : विराट कोहलीच्या फॉर्ममुळे टीम इंडिया चिंतेत? फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “दोन-तीन वेळा अशा प्रकारे आऊट…”

१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली नाही. संघाने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने पहिली विकेट गमावली, तो केवळ १ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार माइल्स मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ३२ धावांची (२३ चेंडू) भागीदारी केली. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार मार्शच्या विकेटसह ही भागीदारी संपुष्टात आली, जो ९ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केवळ ८ धावा करू शकला. यानंतर नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅक्सवेलने ८ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने ११ धावा केल्या.

हेही वाचा – ENG vs NAM : नामिबियाचा धुव्वा उडवत इंग्लंडचे शानदार कमबॅक, तरी सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी ‘या’ संघावर अवलंबून

त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्क स्टॉइनिस यांनी चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. ही उत्कृष्ट भागीदारी १६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडच्या विकेटने संपुष्टात आली. हेडने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. त्यानंतर १७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्क स्टॉइनिस पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टॉइनिसने २९ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. स्टॉइनिस बाद झाला तेव्हा सामना बहुतांशी ऑस्ट्रेलियाच्या ताब्यात होता.त्यानंतर सहाव्या विकेटसाठी मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हिड यांनी ३१ (१६ चेंडू) अशी अखंड भागीदारी केली आणि संघाला विजयाची रेषा ओलांडण्यास मदत केली. यादरम्यान, टीम डेव्हिडने १४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २४ धावा केल्या आणि मॅथ्यू वेडने ५ चेंडूत नाबाद ४ धावा केल्या.