Anushka Sharma Shares Fathers Day Special Post For Virat: भारताचा रनमशीन असलेला विराट कोहली सध्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. गट सामन्यांमध्ये कोहलीची बॅट शांत होती पण सुपर८ मध्ये मात्र त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळेल अशी प्रत्येकाची इच्छा आहे. याचदरम्यान आता विराट कोहलीला फादर्स डेच्या निमित्ताने त्याच्या मुलांकडून एक खास सरप्राईज मिळालं आहे. अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विराटला फादर्सडे च्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कागदावर पायांचे ठसे दिसत आहेत आणि खाली फादर्स डेच्या शुभेच्छा असेही लिहिले आहे. कोहली आणि अनुष्काला दोन मुले आहेत, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. या दोघांच्या पायांचे ठसे त्या कागदावर उमटवले आहेत आणि खाली फादर्सडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने शेअर केलेला हा फोटो व्हायरल होत असून या फोटोवरील कॅप्शननेही सर्वांच लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

अनुष्काने या पोस्टसोबत छानसं कॅप्शनही लिहिले आहे. अनुष्काने पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले ‘एखादी व्यक्ती इतक्या साऱ्या गोष्टींमध्ये इतकी चांगली कशी असू शकते! हे चकित करणारं आहे. आमचं तुझ्यावर प्रेम आहे. याशिवाय, अनेक चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराट आणि अनुष्कावर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”

अनुष्का सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना यावर्षी फेब्रुवारीमध्ये दुसरा मुलगा झाला. या जोडप्याने जाहीर केले की १५ फेब्रुवारीला त्यांचा मुलगा अकाय याचा जन्म झाला. यावेळेस विराट आणि अनुष्का सर्वांच्या नजरेपासून बराच काळ दूर होते. अकायच्या जन्मानंतर काही महिन्यांनी अनुष्का शर्मा आयपीएलमध्ये आऱसीबीला चिअर करताना दिसली. यानंतर टी-२० विश्वचषकासाठी विराट कोहलीसोबत अमेरिकेला गेली आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर अनुष्का शर्माने रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि इतरांसोबत स्टँडमध्ये ग्रुप फोटो काढले.