Florida Flood T20 World Cup 2024 Match: टी-२० विश्वचषक २०२४ च्या गट टप्प्यातील दोन सामने गमावल्यानंतर, पाकिस्तान संघाने तिसरा सामना जिंकला. पण आयर्लंडविरूद्धचा एक सामना बाकी असतानाही पाकिस्तानवर सुपर८ मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. पाऊस नाही तर पुरामुळे पाकिस्तान संघाला अखेरचा सामना न खेळताच माघारी परतावे लागणार आहे. फ्लोरिडामधील हवामानामुळे आता पाकिस्तानचे टेन्शन वाढवले आहे. फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस होत असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय संघ ही आयर्लंडविरूद्धच्या सामन्यासाठी फ्लोरिडाला पोहोचला आहे. पाकिस्तानला शेवटचा सामना फ्लोरिडामध्ये खेळायचा आहे. फ्लोरिडामध्ये पावसामुळे पुराचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा सुपर८ मधील मार्ग अधिक कठीण झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फ्लोरिडामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री मियामी, कॉलियर आणि इतर अनेक शहरांना पुराचा इशारा देण्यात आला आहे. फ्लोरिडाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात वाहने पावसाच्या पाण्याखाली जाताना दिसत आहेत. १४ जून रोजी अमेरिका विरुद्ध आयर्लंड, १५ जून रोजी भारत विरुद्ध कॅनडा आणि १६ जून रोजी पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामने फ्लोरिडामध्ये होणार आहेत. तीनही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – IND v USA: बोरिवलीतील अनेक खेळाडू या सामन्यात असं शास्त्रींनी म्हणताच रोहित शर्मा पाहा काय म्हणाला, “त्यांच्यासोबत एकत्र क्रिकेट…”

पाकिस्तानला आपला अखेरचा सामना १६ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. मात्र, पॉइंट्स टेबल आणि हवामानाची स्थिती पाहता हा संघ शेवटच्या सामन्यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे तीन सामन्यांत दोन गुण आहेत. ते अ गटात तिसऱ्या स्थानावर आहेत. तर अमेरिकेचा संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेचा अखेरचा सामना १४ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. हा सामनाही फ्लोरिडामध्ये होणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर अमेरिका आणि आयर्लंडला प्रत्येकी १ गुण मिळेल. ज्यामुळे अमेरिकेचे पाच गुण होतील. अशा स्थितीत शेवटचा सामना जिंकूनही पाकिस्तान चार गुणचंं मिळवू शकतो. त्यामुळे अखेरचा सामना जिंकले काय आणि गमावला काय दोन्ही त्यांच्यासाठीच असणार आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: भारत वि ऑस्ट्रेलिया सुपर८ फेरीत येणार आमनेसामने, ICCने केलं जाहीर; पाहा टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक

१४ जून हा दिवस पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना होणार आहे. पाऊस आणि पुरामुळे हा सामना रद्द झाल्यास पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.