Rahmanullah Gurbaz and Ibrahim Zadran partnership record : टी-२० विश्वचषकातील १४व्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर ८४ धावांनी मात करत टी-२० क्रिकेटमधील ऐतिहासिक विजय नोंदवल आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानचा हा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला विजय ठरला आहे. अफगाणिस्तानने संघाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघ ७५ धावांत गारद झाला. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेट्ससाठी १०३ धावांची भागीदारी केली. दोघांनी या भागीदारीच्या जोरावर अनेक विक्रम केले आहेत.

रोहित-विराटच्या विक्रमाशी साधली बरोबरी –

रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी युगांडाविरुद्धच्या सामन्यात १५४ धावांची सलामी दिली होती. आता या दोघांनी न्यूझीलंडविरुद्धही शतकी भागीदारी केली आहे. गुरबाज-झाद्रान ही जोडी टी-२० विश्वचषकात सलग दोन सामन्यांमध्ये शतकी भागीदारी करणारी दुसरी जोडी ठरली आहे. याआधी २०१४ च्या टी२० विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सलग दोन सामन्यांमध्ये शतकी भागीदारी केली होती. आता गुरबाज आणि झद्रान यांनी या खेळाडूंची बरोबरी करत दहा वर्षांच्या जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.

Kamran Akmal and Harbhajan Singh Video viral
WCL 2024 : शीख धर्माबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कामरान अकमल-हरभजन सिंग आमनेसामने, VIDEO व्हायरल
India vs Zimbabwe 2nd T20I Updates Cricket Score in Marathi
IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा
Abhishek Sharma's Embarrassing Record
IND vs ZIM 1st T20 : पदार्पणातच अभिषेक शर्माला चाहत्यांनी करुन दिली धोनीची आठवण, नेमकं काय आहे कारण?
Dinesh Lad shared a funny story of Rohit's
“यावेळी १०० अंडी आणून ठेवतो बघू…”, रोहित शर्माबद्दल बालपणीच्या कोचचे मजेशीर वक्तव्य, जाणून घ्या काय आहे कारण?
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
Rohit Sharna
IND vs ENG : “एका क्षणी असं वाटलेलं…”, रोहित शर्माने व्यक्त केली भीती; इंग्लंडवरील विजयाबद्दल म्हणाला…
BCCI shares Vivian Richards in India dressing room video
IND vs BAN : “पॉकेट रॉकेट”, सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी ‘या’ भारतीय खेळाडूला दिले नवीन नाव, पाहा VIDEO
Glenn Maxwell catch by Noor Ahmed in the Gulbadin Naib over
AFG vs AUS : ग्लेन मॅक्सवेलचा झेल ठरला अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’, VIDEO होतोय व्हायरल

टी-२० विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतकीय भागीदारी –

२ – ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन, २००७
२ – रोहित शर्मा आणि विराट कोहली, २०१४
२ – बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान, २०२१
२ – रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान, २०२४

हेही वाचा – AFG vs NZ T20 WC 2024 : अफगाणिस्तानचा न्यूझीलंडला दणका; ८४ धावांनी ऐतिहासिक विजय

मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्या नावावर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतकीय सलामी भागीदारी करण्याचा विक्रम आहे. या दोघांनी टी-२० विश्वचषकात सलामी देताना तीनदा शतकीय भागीदारी केली आहे. ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन, रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी टी-२० विश्वचषकात सलामी देतान प्रत्येकी दोनदा शतकी भागीदारी केली आहे.

हेही वाचा – T20 WC 2024 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘IND vs PAK मॅच म्हणजे युद्ध…’

टी-२० विश्वचषकात सलामीस देताना सर्वाधिक भागीदारी करणारे फलंदाज –

३- बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान
२- ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन
२- डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन
२- रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान