टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाच्या परेडदरम्यान मुंबईत उत्साह शिगेला पोहोचला होता. परेडनंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर एका छोट्या सोहळ्यात सहभागी झाली होती. वानखेडेवर आतमध्ये जातानाच खेळाडू डान्स करत जात होते. यानंतर कर्णधार आणि काही वरिष्ठ खेळाडूंनी संवाद साधला. यावेळेस व्हिक्ट्री लॅपमध्ये भारतीय संघ वंदे मातरम् गाणं गात होता, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. बीसीसीआयनेही या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला. यादरम्यान हार्दिक पंड्यासोबत एक असा काही किस्सा घडला की जे पाहून बुमराह पोट धरून हसत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

भारतीय क्रिकेट संघ स्टँडजवळ होता आणि सर्वच खेळाडू चाहत्यांना अभिवादन करत या व्हिक्ट्री लॅपदरम्यान वंदे मातरम् गाणं गात होते. अचानक चाहत्यांमधून आलेला शर्ट अनावधानाने हार्दिक पांड्याने पकडला जो मैदानात फेकला गेला होता. तो शर्टही अगदी हार्दिकच्या हातावरचं येऊन पडला. हे पाहून जसप्रीत बुमराहला हसू आवरता आले नाही. इतर खेळाडूंकडे पाहत तो हसताना दिसला. यानंतर हार्दिक पांड्याने टी-शर्ट जमिनीवर टाकला.

वंदे मातरम गाणंआणि वानखेडे स्टेडियम हे नाते किती खास आहे हे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांना माहीत आहे. आयसीसी विश्वचषक २०११ चा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला होता आणि तेव्हा टीम इंडिया विजयाच्या जवळ होती तेव्हा संपूर्ण स्टेडियम हे गाणे गात होते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हा क्षण पुन्हा एकदा अनुभवला.

हेही वाचा – VIDEO: आईचं प्रेम! विश्वविजेत्या लेकाला पाहताच मायेने कुरवाळलं, आजारी असतानाही लेकासाठी वानखेडेवर हजर

४ जुलै रोजी सकाळी टीम इंडिया ट्रॉफीसह मायदेशी परतली. वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचे स्वागत केले गेले. त्यानंतर बीसीसीआयने १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून या विश्वविजेत्या संघाला देऊ केले. यावेळी वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते. रोहित शर्मासह संपूर्ण टीमने मैदानात फिरून चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. सर्वजण मिळून वंदे मातरम गात होते, संपूर्ण स्टेडियम या गाण्याने गुंजले होते.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya grabbed a fans tshirt during team india victory parade jasprit bumrah laughs video viral bdg
Show comments