विश्वविजेता ठरलेला भारतीय संघाचं आज मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तब्बल १७ वर्षांनी विश्वचषक भारताकडे आल्याने अवघ्या देशभरातून आनंद व्यक्त केला जातो आहे. यानिमित्ताने भारतीय संघासाठी आज मुंबईत विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मरिन लाईन्स ते वानखेडे स्टेडिअम दरम्यान या रोड शो दरम्यान मुंबईकरांचा उत्साह सळसळता होता. सायंकाळच्या या वेळेत अवघी मुंबापुरी रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे या परिसरात चेंगराचेंगरीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर चपलांचा ढिग जमा झाला आहे. भारतीय टी-२० विश्वचषक विजेता संघ आज भारतात परतला आहे. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ वादळामुळे काही दिवस बार्बाडोसमध्ये अडकला होता. बीसीसीआय आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे भारतीय संघ चार्टर्ड फ्लॅटद्वारे आज दिल्लीत पोहोचला. टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. टीम इंडिया मुंबईत परतली असून मरिन ड्राईव्हवर ते वानखेडे स्टेडिअम भव्य रोड शो करण्यात आला. हेही वाचा >> VIDEO : मरीन ड्राईव्हवर गर्दीचा उच्चांक! मुंबई पोलिसांनी व्हिडिओ शेअर करत मुंबईकरांना केलं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले… या रोड शोसाठी हजारो क्रिकेट चाहते आले होते. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली होती. मरीन ड्राईव्हवर सर्वाधिक गर्दी होती. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. तसंच, मरीनच्या दिशेने येणाऱ्या मुंबईकरांना न येण्याचं आवाहन करण्यात आलं. या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याने अनेकांना श्वाच्छश्वासाचा त्रास झाला. धक्काबुक्की झाल्याने अनेकांच्या चपला पायातून निसटल्या. परिणामी रस्त्यांवर चपलांचा खच पडला आहे. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर मरीन ड्राईव्ह परिसरात चपलांचा खच. #T20WorldCup #TeamIndia #Marindrive pic.twitter.com/wFzpXTzz1K— LoksattaLive (@LoksattaLive) July 4, 2024 दरम्यान, हा कार्यक्रम आता संपन्न झाला असून यशस्वी कार्यक्रमाबाबत मुंबई पोलिसांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. "माझ्या सहकारी मित्रांनो, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत झालेल्या विजयी यात्रेमध्ये तुम्ही केलेले व्यवस्थापन आणि कर्तव्यप्रती असलेले समर्पण वाखण्याजोगे आहे. सर्व अधिकाऱ्यांचा मला अतिशय अभिमान वाटतो. आणि मुंबईकरांनो, मनापासून धन्यवाद तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते. आपण एकत्र मिळून ही जबाबदारी पार पाडली याबद्दल अत्यानंद आहे", अशी मुंबई पोलिसांनी एक्स पोस्ट केली आहे. माझ्या सहकारी मित्रांनो, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत झालेल्या विजयी यात्रेमध्ये तुम्ही केलेले व्यवस्थापन आणि कर्तव्यप्रती असलेले समर्पण वाखण्याजोगे आहे. सर्व अधिकाऱ्यांचा मला अतिशय अभिमान वाटतो.आणि मुंबईकरांनो, मनापासून धन्यवाद तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.… pic.twitter.com/Ix47jPdJ0V— पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) July 4, 2024 तर, मुंबईतील हे विहंमग दृश्य पाहून आनंद महिंद्रा यांनीही पोस्ट केली आहे. मरीन ड्राईव्ह हे आता क्विन नेकलेस नसून जादू की झप्पी आहे, असं ते म्हणाले.