IND vs USA Match Weather Report : १२ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात टी-२० विश्वचषकाचा २५वा सामना होणार आहे. या सामन्यावर संपूर्ण पाकिस्तानची नजर असेल. एकीकडे भारताने आयर्लंड आणि पाकिस्तानला पराभूत करून ४ गुण मिळवले आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेनेही अप्रतिम कामगिरी करत आपले दोन्ही सामने जिंकून ४ गुण मिळवले आहेत. नेट रनरेटनुसार भारत पहिल्या तर अमेरिका गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारत-अमेरिका सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे का? किंवा हा सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा आणि कोणाल तोटा होणार? जाणून घेऊया.

न्यूयॉर्कमध्ये हवामान कसे असेल?

सामन्याच्या वेळी हवामान स्वच्छ असेल अशी अपेक्षा आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित हवामान अहवालानुसार, १२ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये सूर्यप्रकाश आणि आल्हाददायक वातावरण असेल. सकाळी ३३% ढगाळ आणि दुपारी ४५% ढगाळ आकाश राहील. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सामना सुरू होईल. हा सामना भारतीयवेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून पाहता येणार आहे. हवामान अहवालानुसार, सामना होण्याची शक्यता आहे.

Harbhajan Singh Statement on Champions Trophy Hosts Pakistan
Harbhajan Singh: “तुम्हाला खेळायचंय तर खेळा, आमचा संघ पाकिस्तानात पाठवणार नाही..”, लाइव्ह शोमध्ये हरभजन सिंग भडकला, VIDEO व्हायरल
What is the cut-off time for India vs South Africa T20 WC final as rain threatens the match
IND vs SA Final : पावसाने व्यत्यय आणला तर काय असणार ‘कटऑफ टाईम’? जाणून घ्या नियम
Gulbadin Naib fake injury
AFG v BAN: दुखापतीचा बनाव अफगाणिस्तानच्या गुलबदीनच्या अंगलट येणार? आयसीसीचे नियम काय सांगतात?
What if IND v ENG Gets Washed Out due to rain
T20 WC 2024: भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा उपांत्य फेरीचे नियम
India vs Australia, St Lucia weather report
आज पावसाची शक्यता किती टक्के? IND vs AUS सामना पावसाने वाहून गेला तर विश्वचषकाची उपांत्य फेरी कोण गाठणार?
Afghanistan win complicates Group-1 equation
AUS vs AFG : अफगाणिस्तानचा विजय ऑस्ट्रेलियाच्या मुळावर? टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाणार? काय झालंय नेमकं समीकरण?
Babar Azam Accused for Fixing in PAK vs USA Match Watch Video
T20 WC 2024: अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने केलं फिक्सिंग? पाकिस्तानमधल्या ज्येष्ठ पत्रकाराचा आरोप; VIDEO व्हायरल
Virender Sehwag criticizes Babar Azam
VIDEO : ‘तो संघात राहण्याच्याही लायक नाही..’, वीरेंद्र सेहवाग टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर ‘या’ फलंदाजावर संतापला

पावसामुळे सामना रद्द झाला तर…

या सामन्यात पावसाची शक्यता नसली तरी मानू की पावसामुळे हा सामना रद्द झाला तर पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. कारण भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी १ गुण मिळतील, ज्यामुळे त्यांचे एकूण गुण ५-५ होतील. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उर्वरित सामने जिंकूनही केवळ ४ गुण मिळवता येतील आणि भारत आणि अमेरिका टॉप-२ मध्ये राहून सुपर-८ साठी पात्र ठरतील.

हेही वाचा – SR vs Nep T20 World Cup: श्रीलंका गाशा गुंडाळणार; नेपाळविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्याचा फटका

पाकिस्तान ही प्रार्थना करेल –

या सामन्यात भारताने अमेरिकेला पराभूत करावे अशी प्रार्थना संपूर्ण पाकिस्तान करत असेल. यासह सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या पाकिस्तानच्या आशा अबाधित राहतील. तथापि, ते इतके सोपे होणार नाही, कारण त्यांना त्यांचे उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि त्यानंतर शेवटचा सामना गमावण्यासाठी अमेरिकेने हरावा अशी प्रार्थनाही करावी लागेल. असे झाल्यास अमेरिका आणि पाकिस्तानचे प्रत्येकी ४ गुण होतील आणि बाबर आझमच्या संघाचा नेट रनरेट सुधारला तर त्याला सुपर-८ मध्ये स्थान मिळेल.

हेही वाचा – VIDEO : ‘आग लगी बस्ती मैं, आज़म अपनी मस्ती में’, फास्ट फूड खाताना दिसल्याने आझम खान सोशल मीडियावर ट्रोल

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

भारत: रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

अमेरिका: स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल, अँड्रिज गौस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोस्तुश केन्झिगे, सौरभ नेत्रावलकर, अली खान.