पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाबाबत भाकीत वर्तवले आहे. वसीम अक्रमने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या संघांची नावे सांगितली आहेत. ऑस्ट्रेलियात १९९२ च्या विश्वचषकात १८ विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियात गोलंदाजांना कशी मदत करता येईल हेही वसीम अक्रमने सांगितले आहे. तसेच, वसीम अक्रमने कबूल केले आहे की टी२० प्रकार हा गोलंदाजांसाठी नाही, परंतु ऑस्ट्रेलियात (ऑक्टोबर १६-१३ नोव्हेंबर) आयसीसी टी२० विश्वचषकातील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाज खेळात टिकून राहतील. वेग हेच एकमेव ऑस्ट्रेलियात गोलंदाजांच्या यशाची गुरुकिल्ली असेल, असा विश्वास पाकिस्तानचा माजी कर्णधाराने व्यक्त केला आहे. दुबईतील एका कार्यक्रमात त्याने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

तो म्हणाला, टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू कदाचित चांगले खेळतील, त्यांच्याकडे गोलंदाजीचे आक्रमण चांगले आहे, त्यांना त्या खेळपट्ट्या माहित असून त्यावर ते आयुष्यभर खेळले आहेत. भारताकडे भुवनेश्वर कुमार आहे, तो नवीन चेंडूने चांगला स्विंग करतो, पण त्याचा वेग आता सुधारला आहे. जर चेंडू स्विंग होत नसेल, तर तो कदाचित तेथे संघर्ष करू शकतो. परंतु तो खूप चांगला गोलंदाज आहे, यात काही शंका नाही, दोन्ही बाजूंनी स्विंग करतो. शेवटच्या षटकात तो यॉर्कर्स देखील टाकताना दिसत आहे, सगळ्याचा एकच अर्थ तो म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला वेग आवश्यक आहे.”

हेही वाचा : ICC T20 World Cup: मोठी स्पर्धा… मोठी स्क्रीन…! क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज; INOX ने थेट ICC सोबत केला करार  

त्याने उमरान मलिकचे कौतुक करताना म्हटले की, “तुम्ही पाहिला तो काश्मीरचा मुलगा, उमरान मलिक, त्याच्याकडे वेग आहे. भारताला त्याला सांभाळून ठेवण्याची गरज आहे, कारण त्याच्याकडे गती असून तो त्यावर उत्तम यॉर्कर्स टाकताना दिसत आहे. जर मी भारतीय थिंक टँकमध्ये म्हणजेच संघ व्यवस्थापनात असतो, तर मी त्याला नक्कीच अंतिम १५ मध्ये निवडले असते. पुढे बोलताना तो म्हणाला की ” टी२० विश्वचषकातील वसीमने चार संघांची नावे सांगितली जी ऑस्ट्रेलियात उपांत्य फेरीत पोहोचतील असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : युजवेंद्र चहलच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; धनश्रीने करवाचौथच्या दिवशी पोस्ट केला ‘हा’ खास Video  

“यजमान आणि गतविजेते ऑस्ट्रेलिया हे विजेतेपद राखण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. तथापि, ऑस्ट्रेलियन संघाला टीम इंडिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या मजबूत संघांकडून कडवी झुंज पाहायला मिळू शकते. वसीमने यात दोन आशियाई क्रिकेट राष्ट्रांचा समावेश केला ज्यात भारत आणि पाकिस्तान असून ऑस्ट्रेलियासह बाद फेरीत खेळतील असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडलाही पहिल्या चारमध्ये पसंती दिली आहे. अक्रमने दुबईत प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘मला ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान यांना उपांत्य फेरीत पाहायचे आहेत. पण दक्षिण आफ्रिका ही आपल्याला मोठा धक्का देताना पाहायला मिळू शकते.”