ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स असा झाला. या विजयासह उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दक्षिण आफ्रिकेचे लक्ष होते. मात्र, नेदरलँड्सने अविश्वसनीय खेळ दाखवत विजेतेपदाचे दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिकेला १३ धावांनी पराभूत करत अपसेट घडवला. सुपर-१२ मध्ये आफ्रिकेने चार सामन्यांत त्याचे पाच गुण होते. हा सामना जिंकला असता तर तो अंतिम-४ मध्ये पोहोचला असता, पण नशिबाने त्यांना पुन्हा साथ दिली नाही. अपसेटचा सहावा संघ ठरला.

नेदरलँड्सने ग्रुप २ मधील आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात धक्कादायक विजयाची नोंद केली आणि दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर केले. पाकिस्तानने ४ विकेट्स राखून बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता भारत- इंग्लंड आणि पाकिस्तान-न्यूझीलंड असे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. पण, भारताचा हा विजय नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा ठरला आणि त्यांनी २०२४च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश निश्चित केला.

Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Shanshak Singh Performance in IPL 2024
IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

टी२० विश्वचषक २०२२ मध्ये पात्रता फेरीत आपल्याला तीन अपसेट पाहायला मिळाले. पहिल्यांदा अशिया कप चॅम्पियन श्रीलंकाला नामिबियाकडू ५५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन वेळची चॅम्पियन वेस्टइंडीज दोन वेळा अपसेटची बळी ठरली. आधी स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला ४२ धावांनी तर पुन्हा एकदा आयर्लंडने नऊ गडी राखून पराभव केला. त्यामुळे वेस्टइंडीज संघाचे सुपर-१२ आधीच आव्हान संपुष्टात आले.

हेही वाचा :   T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा पराभव जिव्हारी लागला; कर्णधार बावुमा आणि प्रशिक्षक बाउचर यांना भावना अनावर

त्यानंतर सुपर-१२ च्या सामन्यात आयर्लंडने इंग्लंडला मोठा धक्का दिला. आयर्लंडने इंग्लंडचा ५ धावांनी डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पराभव केला. ग्रुप २ मध्ये पाकिस्तान सुद्धा अपसेटचा बळी ठरला. झिम्बाब्वेने पाकिस्तानला एक धावेने पराभव करत आव्हान जवळपास संपुष्टात आणले होते. अ‍ॅडलेडमध्ये नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत स्पर्धेतूनच बाद केले. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकाचा १३ धावांनी पराभव केला. नेदरलँड्सने राऊंड १ मध्ये संयुक्त अरब अमिराती (३ विकेट्स राखून), नामिबिया (५ विकेट्स राखून) यांच्यावर विजय मिळवत सुपर-१२ मधील ग्रुप २ मध्ये स्थान पक्के केले. राऊंड १ मध्ये त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. ग्रुप २ मध्ये त्यांना भारत, बांगलादेश व पाकिस्तानकडून हार मानावी लागली होती. मात्र, अखेरच्या दोन सामन्यांत त्यांनी झिम्बाब्वे (५ विकेट्स राखून) व दक्षिण आफ्रिका (१३ धावांनी) यांच्यावर विजय मिळवत ४ गुणांची कमाई केली. दक्षिण आफ्रिकेला त्यांनी ठेवलेल्या १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. नेदरलँड्ससाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे आता समोर आले आहे.

हेही वाचा :   T20 World Cup: नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहचलेल्या पाकिस्तानचा माजी गोलंदाज अख्तरने दिले भारताला आव्हान

२०२४ चा टी२० विश्वचषक वेस्ट इंडिज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. त्यामुळे हे दोन संघ आधीच पात्र ठरले आहेत. त्यात २०२२च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील अव्वल ८ संघही पुढील स्पर्धेत थेट पात्र ठरले. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स यांनी २०२४च्या विश्वचषकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी आयसीसी क्रमवारीनुसार थेट प्रवेश पक्का केला.