Sachin Tendulkar Tweet for Virat Kohli: आज २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला. या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाने अक्षरशः पाकिस्तानच्या हातातून सामना खेचून आणला. विराट कोहलीची ८२ धावांची खेळी टीम इंडियाच्या विजयासाठी महत्त्वपूर्व ठरली. या सुपर इनिंगनंतर आता किंग कोहलीवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाला भारतीयांना मोठी भेट दिल्याचे म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले आहेत. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कोहलीच्या कौतुकाची एक खास पोस्ट केली आहे.

विराट कोहलीसाठी सचिनने लिहिले की, “विराट, ही तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती. तुला खेळताना पाहणे हे सर्वात आनंददायक होते, रौफविरुद्ध 19 व्या षटकात लाँग ऑनवर बॅकफूटवर मारलेला षटकार नेहमी लक्षात राहील.” विराटने १९ व्या षटकात अत्यंत महत्त्वाच्या वेळी दोन षटकार लगावत भारताची बाजू वर उचलून धरली होती, तर शेवटच्या षटकात अत्यंत हुशारीने खेळून विराटने नाबाद राहून टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

सचिन तेंडुलकरचे कोहलीसाठी ट्वीट

IND vs PAK Video: विराटच्या डोळ्यात अश्रू पाहताच कॅप्टन रोहितची मैदानाकडे धाव; कोहलीजवळ आला अन…

दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या आधीच सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला काही खास टिप्स सुद्धा दिल्या होत्या. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने मागील विश्वचषकात भारताच्या तीन खेळाडूंना तंबूत धाडले होते, त्याला याच सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. जर भारताला यंदा या पराभवाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शाहीन आफ्रिदीच्या सुरुवातीच्या खेळीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे सचिन तेंडुलकरने सांगितले होते. यानुसार कर्णधार रोहित शर्मा व के. एल.राहुल यांना शाहीनच्या गोलंदाजीवर कसं टिकून राहायचं यावर सचिनने मार्गदर्शन केले होते.

IND vs PAK Highlight: किंग कोहली इज बॅक! भारत विरुद्ध पाकिस्तानच्या शेवटच्या षटकात ‘असा’ रंगला थरार

शाहीन आफ्रिदीला बॉल वर उचलून आधी मागे व मग मग थ्रो करण्याची सवय आहे. आफ्रिदी एक आक्रमक गोलंदाज आहे, त्याचा सामना करायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला थोडं सांभाळून खेळणं गरजेचे आहे. जरी बॉल स्विंग होत आहे असे वाटत असेल तरीही तो सरळच येणार असतो हे नेहमी लक्षात ठेवा असे सचिन म्हणाला होता. आजच्या सामान्यता शाहीन आफ्रिदी ठणठणीत होऊन आला असला तरी त्याचा जोर काही आधीसारखा दिसला नाही पण तरीही पाकिस्तानच्या गोलंदाजांचेही भारतीय संघाने कौतुक केले आहे.