T20 World Cup 2022 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषकात होणाऱ्या महामुकाबल्यासाठी दोन्ही देशांमधील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. घराघरांत थांबलेल्या क्रिकेटप्रेमींप्रमाणेच प्रत्यक्ष मेलबर्नमध्ये दाखल झालेल्या क्रीडाप्रेमींमध्येही या सामन्याचा ज्वर पाहायला मिळत आहे. त्यातच आता पाकिस्तानी कॉमेडियन मोमीन साकिब याचा मेलबर्नमधील एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साकिब प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना दिसतो आहे. त्याच्या भन्नाट उत्तरांमुळे हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मोमीन साकिब मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्याला सामन्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता त्यानं त्याच्या हटके शैलीमध्ये त्या प्रश्नांना उत्तरं दिली. क्रिकेटप्रेमींमधील उत्साहाविषयी विचारलं असता साकिब म्हणाला, “एवढ्या लांब ऑस्ट्रेलियात जर भारत-पाकिस्तानचे लोक आले असतील, तर तुम्ही अंदाज लावू शकता की त्यांच्यात किती उत्साह असेल. वर्ल्डकप असो किंवा कोणतीही स्पर्धा. जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असतो, तेव्हा सगळं लक्ष त्या सामन्यावर केंद्रीत होतं. हा वर्ल्डकप नाहीये, ही भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच आहे. मदर ऑफ ऑल मॅचेस!”

Robbers in Pakistan
कंगाल पाकिस्तानात दिवसाढवळ्या सामान्य जनतेला लुटण्याचा विचित्र प्रकार पाहून व्हाल थक्क; एकदा Video पाहाच!
Pakistani Women Viral Video
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या तरुणींनी केली कबाबची चोरी; दुकानदाराने मग केले असे काही की…, पाहा Video
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Pakistan and the Taliban problem; Tehreek-e-Taliban Pakistan
पाकिस्तानला मिळाला धडा असं कोण म्हणालं? ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ काय आहे?

पाऊस आला तर काय?

यावेळी पत्रकारांनी सामन्यादरम्यान पाऊस आला तर काय करणार? असं विचारताच साकिब म्हणाला, “भारत-पाकिस्तानमध्ये लोकांना चिंता आहे की पाऊस आला तर काय करायचं. मी त्यांना म्हटलं तुम्ही साहित्य घेऊन या. पाऊस आला जरी, तरी आपण ते पाणी गोळा करून बाहेर काढू. पण मला वाटतंय सामन्याच्या दिवशी पाऊस पडणार नाही. जर पाऊस झाला तर आपण तो हातात कॅच करून घेऊ”.

“हा धमाल सामना होईल. तिथून विराट कोहली फॉर्ममध्ये आहे, इथून बाबर फॉर्ममध्ये आहे, शाहीनही परत आला आहे. १९९२मध्ये आम्ही एक इतिहास रचला होता, आता २०२३मध्ये आम्ही पुन्हा इतिहास घडवणार आहोत”, असंही साकिब व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय.

शाहरूख खानचा ‘तो’ डायलॉग!

दरम्यान, मेलबर्नमध्ये येण्यासाठी व्हिसा कसा मिळाला? असं विचारताच साकिबनं शाहरूख खानचा ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला. “ओ जानी.. जब आप किसी चीज को शिद्दत से चाहो, तो पूरी कायेनात तुम्हे उससे मिलाने की कोशिश में लग जाती है..शाहरूख भाईनी काय सांगितलं होतं विसरलात का? आमची इच्छा होती आमच्या टीमला बघण्याची.. मग व्हिसाही मिळाला”, असं साकिब म्हणाला.

मोमीन साकिबचं भाकित!

यावेळी साकिबनं पाकिस्तानी फलंदाज कसे खेळतील, याविषयीही भाकित वर्तवलं. “उद्या रिझवान ३०-४० ओव्हर्स खेळेल. बाबर आझम २० ओव्हर्स खेळेल”, असं साकिब म्हणाला.