भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार फलंदाजी केली. या सामन्यात त्याने ६८ धावा केल्या. याआधीही सूर्याने अनेक वेळा शानदार फलंदाजी केली आहे. पर्थमध्ये अर्धशतक झळकावून त्याने गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांच्याशी संबंधित विशेष यादीत स्थान मिळवले. टी-२० विश्वचषकात सलग दोन अर्धशतके झळकावणारा सूर्यकुमार हा भारताचा सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने नाबाद ५१ धावांची खेळी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थमध्ये झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने ४० चेंडूत ६८ धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि ३ षटकार मारले. या टी-२० विश्वचषकातील त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. याआधी सूर्यकुमारने नेदरलँडविरुद्ध नाबाद ५१ धावांची खेळी केली होती. या स्पर्धेत सलग दोन अर्धशतके झळकावणारा तो भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली आणि गौतम गंभीरसारख्या खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022: आक्रमक खेळीसाठी लोकप्रिय असलेला सूर्या स्वभावाने आहे दिलदार, जाणून घ्या त्याचा ‘हा’ किस्सा

गौतम गंभीरने २००७ मध्ये भारतासाठी सलग दोन अर्धशतके झळकावली होती. युवराज सिंगने २००७ च्या टी-२० विश्वचषकातही हा चमत्कार केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये कोहली आणि रोहितने त्याची पुनरावृत्ती केली. कोहलीने २०१६ आणि २०२२ च्या टी-२० विश्वचषकात सलग दोन अर्धशतके झळकावली. केएल राहुलने २०२१ मध्ये ही अप्रतिम कामगिरी केली आहे. आता या यादीत सूर्यकुमारचाही समावेश झाला आहे.

टी-२० विश्वचषकात भारतासाठी सलग दोन अर्धशतके करणारे फलंदाज –

२००७ मध्ये गौतम गंभीर (५१, ५८)

२००७ मध्ये युवराज सिंग (५८, ७०)

२०१४ मध्ये रोहित शर्मा (६२, ५६).

२०१४ मध्ये विराट कोहली (५४, ५७)

२०१४ मध्ये विराट कोहली (७२, ७७)

२०१६ मध्ये विराट कोहली (८२, ८९).

२०२१ मध्ये केएल राहुल (६९, ५०).

२०२२ मध्ये विराट कोहली (८२, ६२)

२०२२ मध्ये सूर्यकुमार यादव (५१, ६८)

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa suryakumar yadav back to back half century for india t20 world cup 2022 vbm
First published on: 31-10-2022 at 15:00 IST