IND vs PAK Score Updates: टी-२० विश्वचषक २०२४ मधील हायव्होल्टेज लढत भारत-पाकिस्तानमध्ये सध्या सुरू आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्याची खेळपट्टी चर्चेचा विषय ठरली आहे, यावर फलंदाजांना धावा काढणं कठीण आहे. जे भारत-पाकिस्तान सामन्यातही दिसून आलं. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १९ षटकांत ११९ धावा करत सर्वबाद झाला. यासह पाकिस्तान संघाने भारताविरूद्ध टी-२० क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे.

पाकिस्तान संघाने भारतीय संघाला या सामन्यात ११९ धावांवर सर्वबाद केले आहे. भारतीय संघ संपूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. यासह टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदाच भारतीय संघाला ऑल आऊट केले आहे. भारतीय संघाच्या नावे ही नकोशी कामगिरी झाली आहे. टी-२० विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध ऑलआऊट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी, टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध टी-२० मध्ये सर्वात कमी धावसंख्या १३३ धावा होती. जी भारतीय संघाने २०१२ साली केली होती.

Taskin Ahmed was punished for sleeping
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी झोपणं बांगलादेशच्या खेळाडूला पडलं महागात, संघाने दिली मोठी शिक्षा, आता मागतोय माफी
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
Three important turning points in India's victory
IND vs ENG : रोहित-सूर्याची फलंदाजी, अक्षर-कुलदीपची फिरकी, ‘या’ तीन टर्निंग पॉइंट्समुळे भारताने इंग्लंडवर केली मात
Inzmam Ul Haq Accused India of Ball Tampering in IND v AUS
“भारताने बॉलसह…” पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा भारतीय संघावर मोठा आरोप, म्हणाले- “अर्शदीपला १५ व्या षटकात…”
IND beat BAN by 50 Runs
IND v BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, या विजयासह टीम इंडियाने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
Ravindra jadeja Lifts Rahul Dravid After Wins Best Fielder Medal
IND v AFG: भारताच्या विजयानंतर जडेजाने ड्रेसिंग रूममध्ये राहुल द्रविडला थेट उचलून घेतलं, पण नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO
'Lene ke dene pad sakte hain': Harbhajan Singh warns Rohit Sharma-led India ahead of T20 World Cup Super 8s
T20 WC 2024 : ‘अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘ही’ चूक पडू शकते महागाात…’, हरभजन सिगचा टीम इंडियाला इशारा
Sanju Samson instead of Shivam Dube In Playing XI Sreesanth Suggests
T20 WC 2024 : ‘शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी द्यावी…’, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी खेळाडूची मागणी

हेही वाचा – IND vs PAK: रोहित शर्मा पुन्हा विसरला, नाणेफेकीच्या वेळेस झाला गोंधळ अन् बाबर आझमने… पाहा VIDEO

टी-२० विश्वचषकातील भारताची सर्वात कमी धावसंख्या
७९ धावा – विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर, २०१६
११०/७ – वि न्यूझीलंड, दुबई, २०२१
११८/८ – वि, दक्षिण आफ्रिका, नॉटिंगहॅम, २००९
११९- विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क, २०२४

हेही वाचा – IND vs PAK Live, T20 World Cup 2024 : बुमराहने पाकिस्तानला दिला पहिला धक्का, कर्णधार बाबर आझम १३ धावांवर झेलबाद

पाकिस्ताविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. विराट कोहलीला ३ चेंडूत केवळ ४ धावा करता आल्या. तर रोहित शर्मा १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, ऋषभ पंतने पुन्हा एकदा झंझावाती खेळी खेळली. ऋषभ पंतने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या. पण त्याला एकाही फलंदाजाची योग्य साथ मिळाली नाही. अक्षर पटेलने २० धावांचे योगदान दिले तर सूर्यकुमार यादवला केवळ ७ धावा करता आल्या. यानंतर शिवम दुबेही ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पंड्याकडून या सामन्यात चांगल्या धावसंख्येची अपेक्षा होती. पण त्यालाही केवळ ७ धावा करता आल्या. दुसरीकडे, रवींद्र जडेजा खाते उघडण्यात अपयशी ठरला. तर बुमराहही येताच बाद झाला. अर्शदीपने संघाच्या धावांमध्ये भर घातली. १ चौकार लगावत ९ धावा केल्या तर सिराजनेही ७ धावा केल्या.