T20 World Cup 2024 IND vs IRE Match Highlights: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ ची विजयाने सुरुवात केली आहे. भारताने बुधवारी आयर्लंडचा ८ विकेट्सने पराभव केला. न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर आयर्लंडने ९७ धावांचे लक्ष्य भारताला दिले होते, जे भारताने १२.२ षटकांत दोन गडी गमावून सहज गाठले. कर्णधार रोहित शर्माने ३७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर रोहितला दुखापत झाल्याने तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने २६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३६ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने दोन आणि विराट कोहली एक धाव घेत बाद झाला. तर पंतच्या विजयी षटकाराने भारताने विजय मिळवला.

तत्पूर्वी, आयर्लंडचा संघ १६ षटकांत ९६ धावांत गारद झाला. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आयर्लंडकडून गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावा केल्या, आयर्लंडची सुरुवात फारच खराब झाली आणि संघाला यातून सावरता आले नाही. सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीने ५ धावा केल्या आणि कर्णधार पॉल स्टर्लिंगने २ धावा केल्या.

Live Updates

T20 World Cup 2024 India vs Ireland Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत वि आयर्लंड यांच्यातील सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत मोठा विजय नोंदवला.

22:52 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारताचा पहिला विजय

रोहित शर्माचे अर्धशतक आणि पंतच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ९७ धावांचे आव्हान झटपट पार केले. यासह भारताने १२.३ षटकांत लक्ष्य गाठत ८ विकेट्सने आणि ४६ चेंडू राखून मोठा विजय मिळवला आहे. रोहित शर्माने या सामन्यात ३७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या तर ऋषभ पंत शेवटपर्यंत नाबाद राहत २६ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ३६ धावा केल्या.

22:51 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: सूर्यकुमार यादव झेलबाद

रोहित शर्मा अचानक अर्धशतकानंतर मैदानाबाहेर गेल्याने सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. पण मोठी कामगिरी न करताच षटकार लगावण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

22:37 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: रोहित शर्माचे अर्धशतक

भारताच्या टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आहे. रोहितने ३६ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. पण लिटीलच्या त्या षटकानंतर रोहित शर्मा बाद न होताच मैदानाबाहेर गेला.

22:14 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: पॉवरप्लेनंतर भारताची धावसंख्या

पॉवरप्लेमध्ये भारताने १ बाद ३९ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा फलंदाजीसाठी कठीण असलेल्या खेळपट्टीवर मोठे फटके खेळताना दिसला. विराट २२ चेंडूत २७ धावा करत खेळत आहे.

22:00 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: विराट कोहली झेलबाद

एडेवरच्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहली मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषजवळ झेलबाद झाला. विराट ५ चेंडूत १ धाव करत झेलबाद झाला. ३ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद २६ धावा आहे.

21:49 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारताच्या डावाला सुरूवात

आयर्लंडने दिलेल्या ९७ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी उतरली आहे. पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रोहितने चौकार लगावत भारताने ७ धावा केल्या.

21:33 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: आयर्लंड ऑल आऊट

आयर्लंडचा संघ ९७ धावांवर ऑल आऊट झाला आहे. अर्शदीपने १६ व्या षटकात अखेरचा चेंडू नो बॉल टाकला. ज्यामुळे आयर्लंडला फ्री हिट मिळाली. अर्शदीपच्या या षटकात १७ धावा केल्या होत्या. फ्री हिट चेंडूवर व्हाईटने चेंडू लगावला आणि तो धाव घेण्यासाठी धावला पण चेंडूकडे न पाहताच त्याने धाव घेतली आणि पंतकडे सिराजने चेंडू फेकताच धावबाद झाला. नो बॉलवर झेलबाद किंवा क्लीन बोल्डला आऊट दिले जात नाही. पण खेळाडू धावबाद झाल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट दिली जाते.

यासह आयर्लंडचा संघ ९६ धावांवर ऑल आऊट झाला. अखेरच्या षटकांमध्ये आयर्लंडकडून डेलेनी चांगली फलंदाजी करत पण एक विकेट बाकी असल्याने भारताने त्यांना ऑल आऊट केलं.

21:21 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: लिटीलची महत्त्वपूर्ण खेळी संपुष्टात

बुमराहच्या १५ व्या षटकात जोशुआ लिटिल क्लीन बोल्ड झाला. बुमराहच्या यॉर्करवर लिटिलची महत्त्वपूर्ण १४ धावांची खेळी संपुष्टात आली.

21:04 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: अक्षरने टिपला भन्नाट झेल

वेगवान गोलंदाजांनंतर भारताकडून आता फिरकीपटू अक्षर पटेल गोलंदाजी करत आहे. अक्षर पटेलच्या १२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नॉन स्ट्रायकर एंडवरून गोलंदाजी करत असलेल्या अक्षरने डाइव्ह करत एक शानदार झेल टिपला. आयर्लंड १२ षटकांनंतर ८ बाद ५२ धावांवर खेळत आहे.

20:59 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: हार्दिकच्या खात्यात तिसरी विकेट

११ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने मार्क एडेयरला झेलबाद केले आहे. १० षटके झाली असताना ५० धावाही न करता आयर्लंड संघाने ७ विकेट्स गमावल्या आहेत. सातव्या षटकापासून ते ११ व्या षटकापर्यंत प्रत्येक षटकात भारताने विकेट घेतली आहे.

20:54 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: सिराजच्या खात्यात विकेट

१० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजनेही विकेट मिळवली. भारताकडून सातत्याने वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत आहेत. ज्याच्यासमोर आयर्लंडचे गोलंदाज टिकले नाहीत आणि त्यांनी झटपट विकेट गमावल्या आहेत. १० व्या षटकानंतर आयर्लंडची धावसंख्या ६ बाद ४९ धावांवर खेळत आहे.

20:50 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारताची भेदक गोलंदाजी

९व्या षटकात हार्दिकने शेवटच्या चेंडूवर अजून एक विकेट मिळवून दिली. पंड्याला पहिल्याच चेंडूवर षटकार लगावणाऱ्या कॅम्फरला झेलबाद केले.

20:46 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: हार्दिकनंतर बुमराहने घेतली विकेट

आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने विक्रमवीर आयरिश खेळाडू हॅरी टेक्टरला झेलबाद केले. टेक्टर ४ धावा करत माघारी परतला.

20:42 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: हार्दिकच्या खात्यात मोठी विकेट

हार्दिक पंड्याने सातव्या षटकात टकरला क्लीन बोल्ड करत विकेट आपल्या नावे केली आहे. आयर्लंडच्या धावांमध्ये भर घालणाऱ्या टकरला पंड्याने बाद करत त्यांच्या धावांना ब्रेक लावला. 7 षटकांंनंतर आयर्लंडची धावसंख्या ३ बाद ३२ धावा आहे.

20:33 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: पॉवरप्ले भारताच्या नावे

२ २६ भारतीय संघाकडून तिन्ही वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आयर्लंडच्या धावांना चांगलाच ब्रेक लावला आहे. पॉवरप्लेनंतर आयर्लंडची धावसंख्या २ बाद २६ धावा इतकी आहे. अर्शदीपने भेदक गोलंदाजी करत दोन मोठे विकेट घेतले तर बुमराहने सहावे षटक मेडेन टाकले.

20:17 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: अर्शदीपच्या एकाच षटकात दोन विकेट

अर्शदीपच्या दुसऱ्या षटकात पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर अर्शदीपने शानदार गोलंदाजी करत दोन मोठे विकेट घेतले. पहिल्या चेंडूवर आयरिश कर्णधार स्टर्लिंगच्या बॅटची कड घेत चेंडू उंच गेला आणि पंतने झेल टिपला. तर अखेरच्या चेंडूवर माजी कर्णधार बालबर्नी याला ५ धावांवर क्लीन बोल्ड केले. ३ षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या २ बाद ९ धावा आहे.

20:16 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारताला मिळाला पहिला ब्रेकथ्रू

भारताला तिसऱ्या षटकात पहिली विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा अर्शदीपने सुरूवातीच्या षटकात विकेट मिळवली आहे. ७ धावांवर आयर्लंड खेळत असताना अर्शदीपने संघाचा कर्णधार पॉल स्टर्लिंगला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले आहे.

20:03 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: सामन्याला सुरूवात

भारताच्या आयर्लंडविरूद्ध पहिल्या वर्ल्डकप सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून अर्शदीप सिंगच्या हाती नवा चेंडू आहे. तर बालबर्नी आणि कर्णधार पॉल स्टर्लिंगची जोडी मैदानात आहे.

19:41 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारताची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

https://twitter.com/BCCI/status/1798356347337232441

19:41 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: आयर्लंडची प्लेइंग इलेव्हन

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट

19:39 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारताची प्लेईंग इलेव्हन

भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा अखेर निर्णय झाला असून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी या सामन्यात सलामीला उतरणार आहे. तर ऋषभ पंत आणि सूर्या हे तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर खेळतील तर भारताने शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या चारही अष्टपैलूंना खेळण्याची संधी दिली आहे. तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज खेळतील.

19:34 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारतीय संघाने जिंकली नाणेफेक

टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत वि आयर्लंड सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी सलामीला उतरणार आहे.

19:03 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारतीय संघ चार अष्टपैलू खेळाडूंसह मैदानात उतरणार?

रोहित शर्मा सामन्यापूर्वी म्हणाला, "हे अजूनही एक गूढ आहे, तुम्ही पुढे पाहाल. या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूची भूमिका महत्त्वाची असेल. आमचे दोन फिरकीपटू जडेजा आणि अक्षर हे अष्टपैलू खेळाडू आहेत. जर संघात समतोल साधायचा असेल तर मग अष्टपैलू खेळाडू असले पाहिजेत. त्यांचा सामन्यादरम्यान वापर कसा करायचा याचा विचार केला आहे. या चौघांची भूमिका महत्त्वाची असेल. हे चौघे एकत्र खेळू शकतील की नाही ते बघू. अधिक पर्याय असणे केव्हाही चांगले. बांगलादेशविरुद्ध फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन षटके टाकली जी चांगली होती. आमच्याकडे अधिक गोलंदाज आणि फलंदाजी बाजू किती खोल मजबूत असेल, याचा विचार केला जाईल."

18:28 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: लाइव्ह प्रक्षेपण

टी-२० वर्ल्डकपचे सर्व सामने हे अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचे सर्व सामने हे भारतात स्टार स्पोर्ट्स या चॅनेवर टीव्हीवर दाखवले जातील. भारत आणि आयर्लंडमधील हा सामना मोबाईलवर लाइव्ह पाहायचा असेल तर डिज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर फ्री पाहता येणार आहे.

18:25 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: सामन्याची वेळ

भारत विरूद्ध आयर्लंडमधील सामना हा भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. तर ७.३० वाजता सामन्याची नाणेफेक होईल.

18:23 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: हवामानाचा अंदाज

अॅक्युवेदरनुसार, ५ जून रोजी न्यूयॉर्कमधील हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि सामन्याच्या वेळेतही पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध आयर्लंड सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे आणि हवामानाच्या अंदाजानुसार, त्या वेळी पावसाची २५% शक्यता आहे.

18:16 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज</p>

18:15 (IST) 5 Jun 2024
T20 WC 2024 IND vs IRE: आयर्लंड संघ

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, रॉस अडायर, बॅरी मॅककार्थी, मार्क ॲडायर, जोशुआ लिटल, क्रेग यंग, ​​बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम

 

IND vs IRE Highlights , T20 World Cup 2024: भारतीय संघ आयर्लंडविरूद्धच्या सामन्याने टी-२० विश्वचषक २०२४ च्या मोहिमेला विजयाने सुरूवात केली आहे. या सामन्यात भारताने आयर्लंड संघावर ८ विकेट्स आणि ४६ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.