IND vs IRE Match Pitch and Weather Report : टी-२० विश्वचषक २०२४ चा आठवा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात बुधवारी ५ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आयर्लंडविरुद्धच्या विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. दुसरीकडे, आयर्लंडच्या मनात हीच गोष्ट सुरू आहे की, भारताचा पराभव करून विश्वकप दौऱ्याची सुरुवात करता येईल. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपले सर्वस्व पणाला लावतील. या सामन्यापूर्वी पिच रिपोर्ट आणि वेदर रिपोर्ट जाणून घेऊया.

भारत विरुद्ध आयर्लंड सामन्याची पिच रिपोर्ट –

न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण १ सामना खेळला गेला आहे. या सामन्यात गोलंदाजांचे पूर्ण वर्चस्व दिसून आले. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकीपटूंनाही मदत मिळत होती. फलंदाज सतत संघर्ष करताना दिसले. तथापि, येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामनाही खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने फलंदाजी करताना १८२ धावा केल्या होत्या.

मात्र, आतापर्यंत येथे गोलंदाजांना अधिक मदत झाल्याचे दिसून आले आहे. मात्र नव्या खेळपट्टीमुळे याबाबत काहीही सांगणे कठीण होणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यातील खेळपट्टीचे स्वरूप दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असण्याची शक्यता आहे. नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या ७७ धावा आणि दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या ८० धावांची आहे.

हेही वाचा – VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”

वेदर रिपोर्ट –

हवामान अंदाजानुसार, न्यूयॉर्कमध्ये ५ जून रोजी पाऊस अपेक्षित आहे. दुपारी पावसाची शक्यता २४% आहे तर रात्री पावसाची शक्यता ८०% आहे. याशिवाय तापमान २४ ते २० अंशांपर्यंत असू शकते. ताशी १५-१६ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते. आर्द्रता ६५% ते ८६% पर्यंत असू शकते.

हेही वाचा – T20 WC 2024 : आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी सुनील गावसकरांनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान

दोन्ही संघांचे पूर्ण पथक:

भारतीय संघ: रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, विराट कोहली, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, शिवम दुबे, अर्शदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल.

आयर्लंड संघ: अँडी बालबिर्नी, पॉल स्टर्लिंग, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, बेन व्हाईट, क्रेग यंग, ​​बॅरी मॅककार्थी, मार्क अडायर, जोशुआ लिटल, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, नील रॉक, रॉस अडायर.