T20 World Cup 2024, India Won Against Pakistan: न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान एक मोठी घटना घडली. सर्वचजण या अटीतटीच्या सामन्यावर आपली नजर ठेवून असताना सामन्यादरम्यान एक विमान स्टेडियमवरून गेले आणि ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. भारत पाकिस्तान सामन्यादरम्यारन मोठी सुरक्षा व्यवस्था नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर ठेवण्यात आली होती. पण वर आकाशात हा प्रकार घडला. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि काही वेळातच व्हायरल झाला. याविमानासोबतच ‘रिलीज इम्रान खान’चे बॅनर हवेत दिसत होते.

आपल्या नेतृत्वाखाली १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानचे नेतृत्व करणारा इम्रान खान सध्या तुरुंगात आहे आणि त्यांचे समर्थक त्यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. इम्रान हे २०१८ ते २०२२ पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधानही राहिले आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रगीत सुरू असताना सामना सुरू होण्यापूर्वी हे विमान स्टेडियमवरून घिरट्या घालताना दिसले. पाकिस्तान तेहरीक-ए-पाकिस्तान आपला नेता इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी करत आहे.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Navneet Rana
Navneet Rana : ‘खुर्च्या फेकल्या, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न…’, अमरावतीमधील प्रचार सभेतील राड्यानंतर नवनीत राणा यांचे गंभीर आरोप
Uddhav Thackeray on Rudraksh in hand
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हातात शिवबंधन नाही तर रुद्राक्ष, काय आहे कारण? म्हणाले, “मी..”
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर पूर्वीच दहशतवादी हल्ल्याचा धोका होता, त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मात्र हे विमान ज्या पद्धतीने स्टेडियमवरून गेले त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा – IND vs PAK: ऋषभने रचला पाया, बुमराहने रचला कळस; भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय

पाकिस्तानविरुद्ध भारताची फलंदाजी निराशाजनक राहिली आणि भारतीय संघ १९ षटकांत ११९ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्यांदाच टी-२० प्रकारात पाकिस्तानने भारताला सर्वबाद केले होते. पण भारताने याच सामन्यात दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानला चोख उत्तर दिले. भारताने १२० धावांच्या छोट्या लक्ष्याचा बचाव करत ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयात भारताचे गोलंदाज हिरो ठरले. या गोलंदाजी विभागाचे नेतृत्त्व भारताचा उत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहने केले. जो सामनावीरही ठरला. बुमराहने ३ विकेट घेत फक्त १४ धावा दिल्या आणि भारताला विजयाच्या जवळ नेले.