T20 World Cup 2022, IND vs SA Highlights Score Updates: टी२० विश्वचषक २०२२ मधील हा ३० वा सामना असून पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला आणि दक्षिण आफ्रिकेने तो सामना पाच गडी राखून जिंकला. या विजयाने आफ्रिका संघ उपांत्य फेरीच्या एक पाऊल अजून जवळ गेला आहे. एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार भागीदारीने भारताला विजयापासून लांब नेले. सुर्यकुमार यादवची ६८ धावांची खेळी व्यर्थ गेली. लुंगी एनगिडीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

टीम इंडियाने पहिल्या दहा षटकात शानदार गोलंदाजी केली. डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन गडी झटपट बाद करत दक्षिण आफ्रिका संघाला अडचणीत आणले. पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम यांनी शानदार अर्धशतके झळकावत दक्षिण आफ्रिकेला विजयाचा उंबरठ्यावर नेले.खराब चेंडूंचा समाचार घेत त्यांनी संघाला विजयाच्या जवळ नेले. यादरम्यान दोघांना टीम इंडियाने गचाळ क्षेत्ररक्षण करत दोन जीवदान देखील दिले. चौथ्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केल्यानंतर मार्करम ५२ धावा करत बाद झाला. डेव्हिड मिलरने ४६ चेंडूत ५९ धावा करत नाबाद राहिला.

IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Jan Nicol Loftie Eaton Breaks Kusal Malla's Record
VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धावा केल्या. भारताची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाला २३ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. केएल राहुल ९ धावा तर विराट कोहली १२ धावा काढून बाद झाला. तिघांनाही लुंगी एनगिडीने तंबूत पाठवले. यानंतर अक्षर पटेलच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला दीपक हुडाही अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. हुडाला नॉर्टजेने यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्या दोन धावा करून बाद झाला. एनगिडीने हार्दिकला तंबूत पाठवले.

४९ धावांवर पाच विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने दिनेश कार्तिकसह टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३० चेंडूंमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११वे अर्धशतक ठोकले. या दोघांनी मिळून भारताला १०० धावांच्या पुढे नेले. कार्तिक १६व्या षटकात वेन पारनेलकरवी झेलबाद झाला. त्याचा झेल रिले रुसोने घेतला. कार्तिकला १५ चेंडूत केवळ सहा धावा करता आल्या.

Live Updates

India vs South Africa T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक सामना हायलाइट्स

 

20:04 (IST) 30 Oct 2022
INDvsSA:दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय झाला.

दक्षिण आफ्रिका १३७-५

20:02 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: ५ चेंडूत ६ धावांची गरज

दक्षिण आफ्रिकेला ५ चेंडूत ६ धावांची गरज आहे

दक्षिण आफ्रिका १२८-५

19:58 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: डेव्हिड मिलरचे अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलरचे अर्धशतक पूर्ण झाले.

दक्षिण आफ्रिका १२६-५

19:56 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेला १२ चेंडूत १२ धावांची गरज

आर. अश्विनने षटकातील शेवटच्या चेंडूवर माकंडिंगचा प्रयत्न केला.

दक्षिण आफ्रिका १२२-५

19:54 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: ट्रिस्टन जॅन्सेन स्टब्स बाद

आर. अश्विनने ट्रिस्टन जॅन्सेन स्टब्सला बाद केले. त्याने ६ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका १२२-५

19:39 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: अखेर भागीदारी तुटली, एडन मार्कराम बाद

हार्दिक पांड्याने भागीदारी तोडत एडन मार्करामला बाद केले. त्याने ५२ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका १००-४

19:37 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: दिनेश कार्तिकला दुखापत, ऋषभ पंत मैदानात

सामन्यात दिनेश कार्तिकला दुखापत झाली असून तो मैदानाबाहेर गेला आहे. ऋषभ पंतने त्याची जागा घेतली असून तो आता विकेटकीपिंग करणार आहे.

दक्षिण आफ्रिका ९८-३

19:33 (IST) 30 Oct 2022
INDvsSA:एडन मार्करामचे अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त फलंदाज एडन मार्करामने दमदार अर्धशतक झळकावत सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकवला.

दक्षिण आफ्रिका ९५-३

19:26 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: एडन मार्कराम- डेव्हिड मिलर यांची अर्धशतकी भागीदारी

एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली असून दक्षिण आफ्रिका आता मजबूत स्थितीत दिसत आहे.

दक्षिण आफ्रिका ८५-३

19:24 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: भारतीय संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण

डेव्हिड मिलर धावबाद होताना वाचला. पुन्हा एकदा रोहित शर्माने थ्रो चुकीचा केला. या सामन्यात दोन धावबाद आणि दोन झेल भारतीय संघाने सोडले.

दक्षिण आफ्रिका ७४-३

19:19 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: एडन मार्करामचा झेल कोहलीने सोडला

आर. अश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एडन मार्करामचा झेल सोडला आता हा झेल टीम इंडियाला किती महागात पडेल हे येणारा काळच ठरवेल.

दक्षिण आफ्रिका ६५-३

19:10 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेच्या निम्म्या षटकात ५० धावा ही नाही

दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दहा षटकात ५० धावा देखील करता आल्या नाहीत.

दक्षिण आफ्रिका ४०-२

19:06 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: एडन मार्कराम धावबाद होताना वाचला

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर एडन मार्कराम धावबाद होताना वाचला. रोहित शर्माने थ्रो केला मात्र तो स्टंप्सला लागला नाही.

दक्षिण आफ्रिका ३९-३

18:58 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: भारतीय संघाने एक रिव्ह्यू गमावला

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरच्या बॅटच्या कोपऱ्याला चेंडू लागल्याने तो पायचीत होण्यापासून वाचला आणि भारतीय संघाने एक रिव्ह्यू गमावला.

दक्षिण आफ्रिका ३३-३

18:48 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: पॉवर-प्ले मध्ये दक्षिण आफ्रिकेची अडखळत सुरुवात

पॉवर-प्ले मध्ये दक्षिण आफ्रिकेची अडखळत सुरुवात झाली आहे. अर्शदीप सिंगच्या दोन विकेट्सने भारत या सामन्यात पुन्हा आला आहे. भुवनेश्वर कुमारला जरी विकेट मिळाली नसली तरी त्याने कसून गोलंदाजी केली आहे. शमीने एक गडी बाद करत चांगली साथ दिली.

दक्षिण आफ्रिका २४-३

https://twitter.com/BCCI/status/1586709026586660864?s=20&t=vF2x7T_RHT5nNtnlHhXZPg

18:46 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: टेम्बा बावुमा बाद

कर्णधार टेम्बा बावुमा १० धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला दिनेश कार्तिक करवी झेलबाद केले.

दक्षिण आफ्रिका २४-३

https://twitter.com/BCCI/status/1586708674344636425?s=20&t=vF2x7T_RHT5nNtnlHhXZPg

18:28 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, रिली रोसोव बाद

अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेला एकापाठोपाठ दोन धक्के दिले. रिली रोसोव भोपळाही न फोडता बाद झाला.

दक्षिण आफ्रिका ३-२

https://twitter.com/BCCI/status/1586703765532725249?s=20&t=kYje-695pGfKCBLvEdICKQ

18:24 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

क्विंटन डी कॉकला अवघ्या एका धावेवर माघारी धाडत अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला.

दक्षिण आफ्रिका ३-१

18:18 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: धावांचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकेचे सलामीवीर मैदानात

भारताने दिलेल्या १३४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकेचे सलामीवीर मैदानात आले.

दक्षिण आफ्रिका ०-०

18:07 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियाचे १३४ धावांचे आव्हान

सुर्यकुमार यादवच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने १३४ धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारत १३३-९

18:06 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: मोहम्मद शमी धावबाद

मोहम्मद शमी भोपळाही न फोडता धावबाद झाला आहे.

भारत १३०-९

18:02 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: अखेर सुर्यकुमार बाद

सुर्यकुमार यादवची तुफानी खेळी समाप्त झाली. त्याने ४० चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी केली.

भारत १२७-८

https://twitter.com/BCCI/status/1586697545807548416?s=20&t=dcj3NtvrowHWGQ_b5qzHpg

17:58 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: सूर्याचा शानदार शो

सुर्यकुमार यादवचा टेनिस फटका! चौकारांची आतिषबाजी करत भारताची धावसंख्या पुढे नेत आहे.

भारत १२४-६

17:50 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: अखेरच्या चार षटकात धावगती वाढवण्याची गरज

अखेरच्या चार षटकात भारतीय संघाला धावगती वाढवण्याची गरज आहे. किमान १५० धावांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

भारत १०६-६

17:42 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: सुर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक

टीम इंडिया अडचणीत असताना सूर्याने शानदार अर्धशतक झळकावले. भारताचे शतक देखील पूर्ण

भारत १००-५

https://twitter.com/BCCI/status/1586692425686601729?s=20&t=H1x_1EgB5ge1dTyHrZVajg

17:37 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: दिनेश कार्तिक धावगती वाढवण्यात अपयशी

दिनेश कार्तिक स्ट्राइक रेट वाढवने गरजेचे आहे. तो १३ चेंडूत ५ धावांवर खेळत आहे.

भारत ८९-५

17:33 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: सुर्यकुमार यादवचा डाव सावरण्याचा प्रयत्न

सुर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक यांच्यात आतापर्यत ३५ धावांची भागीदारी झाली आहे.

भारत ८४-५

17:26 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: भारतीय संघाला मोठ्या भागीदारीची गरज

टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज असून राहुल द्रविडने सुर्यकुमार आणि कार्तिकशी चर्चा केली.

भारत ६७-५

17:14 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: लुंगी एनगिडीची घातक गोलंदाजी, पांड्या बाद

लुंगी एनगिडीच्या घातक गोलंदाजसमोर भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरत आहेत. कागिसो रबाडाने उत्कृष्ट झेल घेत हार्दिक पांड्याला अवघ्या दोन धावांवर बाद केले.

भारत ४९-५

https://twitter.com/BCCI/status/1586684895392301063?s=20&t=r7faLGMRnyozgwJfyoPSDQ

17:07 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: संघात स्थान मिळालेला दीपक हुड्डा बाद

संघात स्थान मिळालेला दीपक हुड्डा बाद भोपळाही न फोडता बाद झाला. अॅनरिक नॉर्टजेने त्याला क्विंटन डी कॉक करवी झेलबाद केले.

भारत ४२-४

https://twitter.com/BCCI/status/1586683629090095104?s=20&t=rPi8uC5RKziqQhogoeAHHQ

17:03 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: टीम इंडियाला खूप मोठा धक्का, विराट बाद

लुंगी एनगिडीने भारताला एकापाठोपाठ तीन धक्के दिले. विराट कोहलीने १२ धावा केल्या.

भारत ४१-३

https://twitter.com/BCCI/status/1586682678509699074?s=20&t=-6pSzgw6MWCw9HWle9pboQ

17:00 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: पॉवर प्ले मध्ये भारताची अडखळत सुरुवात

दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीने भेदक गोलंदाजी करत टीम इंडियाला अडचणीत आणले.

भारत ३३-२

16:55 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: भारताला दुसरा धक्का, राहुल बाद

एकाच षटकात लुंगी एनगिडी केएल राहूलला बाद करत टीम इंडियाला मोठा झटका दिला.

त्याने १४ चेंडूत ९ धावा केल्या.

भारत २६-२

https://twitter.com/BCCI/status/1586680743064993794?s=20&t=R9w2VKbKV5Pi94Z1keXbCQ

16:52 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: भारताला मोठा धक्का, रोहित बाद

टीम इंडियाला मोठा धक्का बसला. लुंगी एनगिडीने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. त्याने १४ चेंडूत १५ धावा केल्या.

भारत २३-१

https://twitter.com/BCCI/status/1586679589652369409?s=20&t=we_NOQJGxsbbQWWYpu12Rw

16:45 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: केएल राहुलला चेंडू लागला

राहुलला जोरात चेंडू लागल्याने थोडीशी दुखापत झाली आहे पण त्यानंतर त्याने पुन्हा तो खेळायला सुरुवात केली.

भारत १४-०

16:41 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: राहुलचा शानदार षटकार

राहुलने शानदार ८४मी.चा षटकार मारत पुनरागमनाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

भारत १४-०

16:39 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: टीम इंडियाने षटकार मारत उघडले गुणांचे खाते

रोहित शर्माने ८१ मी. चा शानदार षटकार रबाडाला खेचत टीम इंडियाच्या गुणांचे खाते उघडले.

भारत ६-०

16:36 (IST) 30 Oct 2022
INDvsSA:वेन पारनेलने पहिले षटक टाकले निर्धाव

केएल राहुल फलंदाजीत अजूनही चाचपडताना दिसत आहे. वेन पारनेलने पहिले षटक निर्धाव टाकले.

भारत ०-०

16:29 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: भारतीय संघाचे सलामीवीर खेळपट्टीवर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात आले आहेत.

भारत ०-०

16:23 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: थोड्याच वेळात दोन्ही देशांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात

थोड्याच वेळात दोन्ही देशांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले आहेत.

16:22 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: पर्थ येथील ऑप्टस खेळपट्टीवर बॅकफूटवर खेळणे गरजेचे

भारतीय फलंदाजांना पर्थ येथील ऑप्टस खेळपट्टीवर बॅकफूटवर खेळणे गरजेचे आहे असे मत संजय बांगर यांनी मांडले.

16:06 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिका प्लेईंग ११

दक्षिण आफ्रिकेनेही संघात बदल करत लुंगी एनगिडीला तबरेझ शम्सीच्या जागी स्थान देण्यात आले.

https://twitter.com/BCCI/status/1586670300288061440?s=20&t=g_cS6om7XRm-EMsmEuXeNA

16:01 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: थोड्याच वेळात दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी येतील

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा नाणेफेकीसाठी तयार आहेत.

15:59 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: पिच रिपोर्ट

पर्थ येथील ऑप्टस स्टेडियममध्ये खेळणार सामना होणार असल्याने इथे गोलंदाजांना जास्त संधी मिळते. सध्या या खेळपट्टीवर फक्त चार सामने झाले असून त्यातील तीन विश्वचषकातील आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम कोणताही संघ याठिकाणी फलंदाजी घेईल असे सुनील गावसकर यांनी पिच रिपोर्टमध्ये सांगितले.

15:48 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: भारतीय संघ स्टेडियममध्ये पोहचला

टीम इंडिया पर्थ येथील ऑप्टस स्टेडियममध्ये पोहचली असून सध्या त्या ठिकाणी सामन्याआधी थोडा सराव करत आहे.

15:21 (IST) 30 Oct 2022
INDvsSA: सध्या हवामान ढगाळ

पर्थमध्ये काल खूप जास्त पाऊस पडला. टी२० विश्वचषक २०२२ मध्ये पावसामुळे चार सामने हे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे भारत- दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस खोडा तर घालणार नाही ना याची चाहत्यांना चिंता वाटत आहे. त्याच मैदानावर सध्या पाकिस्तान वि. नेदरलँड्स यांच्यात सामना सुरु असताना पाऊस आला होता. पण लगेच सामना सुरु झाला.

India vs South Africa T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक सामना हायलाइट्स

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थ येथे खेळला जाणार आहे. हा सामना जो जिंकेल तो उपांत्य फेरी गाठणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे.