India beat Ireland in T20 World Cup 2024 : टीम इंडियाने टी-२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत टी-२० विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या शानदार गोलंदाजीच्याजोरावर आयर्लंडला ९६ धावांत गुडाळले. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळी साकारली. यानंतर ऋषभ पंतने १३व्या षटकात षटकार मारुन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

सलामीच्या सामन्यात रोहित-ऋषभ चमकले –

आयर्लंडने दिलेल्या ९७ धावांचा पाठलाग करताना ऋषभ पंतने १३व्या षटकात बॅरी मॅकार्थीच्या चेंडूवर षटकार मारून सामना संपवला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५२ धावा केल्या. मात्र, त्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही. आता भारतीय संघ अ गटात दोन गुणांसह अव्वल स्थानावर आला आहे. त्याचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी ९ जून रोजी होणार आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त ऋषभ पंतने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर विराट कोहली (१) आणि सूर्यकुमार यादव (२) स्वस्तात बाद झाले.

India beat Zimbabwe by 10 wickets
IND vs ZIM 4th T20 : शुबमनच्या नेतृत्वाखाली युवा ब्रिगेड मालिका जिंकण्यात ‘यशस्वी’, झिम्बाब्वेचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा
Yuvraj Singh explosive batting 28 balls 59 runs
WLC 2024 : ५ षटकार… ४ चौकार, युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला करुन दिली जुन्या दहशतीची आठवण
Zimbabwe beat India by 13 runs in 1st T20 Match
झिम्बाब्वेची विजयी सलामी! विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ पहिल्याच सामन्यात ठरली अपयशी
India vs Zimbabwe match updates
IND vs ZIM 1st T20 : भारतीय संघात तीन युवा खेळाडूंनी केले पदार्पण, शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मिळाली संधी
IND vs SA Final Score T20 World Cup 2024 Updates in Marathi
IND vs SA Final: रोहित शर्माच्या टीम इंडियाने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
IND vs SA Final Highlights T20 World Cup 2024 Updates in Marathi
IND vs SA Final Highlights : सूर्यकुमार यादवचा झेल ठरला निर्णायक! टीम इंडियाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
Three important turning points in India's victory
IND vs ENG : रोहित-सूर्याची फलंदाजी, अक्षर-कुलदीपची फिरकी, ‘या’ तीन टर्निंग पॉइंट्समुळे भारताने इंग्लंडवर केली मात

न्यूयॉर्कमधील हा दुसरा सामना असून येथील संघ सलग तीन डावात १०० हून अधिक धावाही करू शकलेला नाही. यापूर्वी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात श्रीलंकेचा संघ ७७ धावा करू शकला होता, तर दक्षिण आफ्रिकेने त्याचा पाठलाग केला होता. आता या यादीत आयरिश संघही सामील झाला आहे. मात्र, या खेळपट्टीवर भारतीयने संघाने ९६ धावांचा पाठलाग करताना १२.२ षटकात सामना जिंकला.

जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर –

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात खराब झाली. डावाच्या तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टर्लिंग दोन धावा करून बाद झाला, तर बालबिर्नी पाच धावा करून बाद झाली. यानंतर हार्दिक पांड्याने आयरिश संघाच्या डावाला सुरुंग लावला. त्याने लॉर्कन टकर (१०), कर्टिस कान्फर (१२) आणि मार्क एडेर (३) यांना बाद केले. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने हॅरी टेक्टर (४) आणि जोशुआ लिटल (१४) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सिराजने जॉर्ज डॉकरेलला (३) तर अक्षर पटेलने बॅरी मॅकार्थीला (०) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डेलानी शेवटची विकेट म्हणून नो बॉलच्या फ्री हिटवर धावबाद झाला. भारताकडून हार्दिकने तीन विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.