वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ वेगळ्याच ईष्येने खेळतो. त्यांना हरवणं कठीण मानलं जातं. रविवारी सकाळी अफगाणिस्तानने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला नमवण्याची किमया केली. अफगाणिस्तानच्या दमदार सांघिक खेळासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ निष्प्रभ ठरला. या विजयाचं जेवढं श्रेय अफगाणिस्तानच्या खेळाडूंना जातं तेवढंच पडद्यामागच्या दोन नायकांना जातं. अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट आणि गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातलं हाडवैर क्रिकेटचाहते जाणतातच. जोनाथन ट्रॉट खेळत असताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविरुद्ध झालेली बाचाबाची चर्चेत राहिली होती. त्याच ट्रॉटने अफगाणिस्तानच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयासाठी डावपेच आखले. ट्रॉटला साथ मिळाली टी२० विशेषज्ञ ड्वेन ब्राव्होची.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
AUS vs AFG match memes viral on social media
VIDEO : अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मीम्सचा महापूर, नेटकऱ्यांनी मॅक्सवेलची अंडरडेकरशी केली तुलना
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”
Afghanistan win complicates Group-1 equation
AUS vs AFG : अफगाणिस्तानचा विजय ऑस्ट्रेलियाच्या मुळावर? टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाणार? काय झालंय नेमकं समीकरण?
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Gulbadin Naib Faking Injury to Waste Time
AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO
IND beat BAN by 50 Runs
IND v BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, या विजयासह टीम इंडियाने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

किंग्सटाऊनच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नाही याची जाणीव अफगाणिस्तानच्या संघाला होती. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिस्तबद्ध मारा करत ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला १४८ धावांचीच मजल मारू दिली. ऑस्ट्रेलियाचं आक्रमण दर्जेदार असलं तरी विकेट्स फेकू नका. खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करा, छोट्या पण उपयुक्त खेळी करा. दीडशे धावा पुरेशा ठरू शकतात हा ट्रॉट यांचा सल्ला अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मानला. रहमनुल्ला गुरबाझ आणि इब्राहिम झाद्रान यांनी ११८ धावांची खणखणीत सलामी दिली. या सलामीनंतर अफगाणिस्तानची घसरण उडाली पण त्यांचा ऑलआऊट झाला नाही. करीम जनतने १३ तर मोहम्मद नबीने १० धावा करत धावफलक हलता ठेवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ जोरदार आक्रमण करतो हे ट्रॉट यांना पक्कं ठाऊक होतं. पण असं करताना विकेट्स पटकावण्याची शक्यता जास्त असते. त्यानुसार अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाची अवस्था ३२/३ अशी केली. टी२० क्रिकेटमध्ये फलंदाज जोरदार फटकेबाजी करत असताना शांत राहून गोलंदाजी कशी करावी याचा वस्तुपाठ म्हणजे ड्वेन ब्राव्हो. जगभरात टी२० लीग खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ब्राव्होने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना नक्की कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करा याचा मंत्र दिला.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना वेगात येणारा चेंडू ही अडचण नाही, उलट ते याचा फायदा उठवतात. म्हणूनच वाईड यॉर्कर, स्लोअरवन, कटर यावर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी भर दिला. ऑस्ट्रेलियाने एकदा पवित्रा बदलला की त्यांना रोखणं अवघड होऊ शकतं त्यामुळे अफगाणिस्तानने स्वैर मारा टाळला. मोहम्मद नबी, रशीद खान, नूर अहमद यांचे चेंडू कसे वळतात याचा कोणताही अंदाज ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना येत नव्हता. रशीदला खेळणं ऑस्ट्रेलियाला नेहमीच कठीण जातं. खेळपट्टी फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांना साथ देते आहे हे ओळखून नवीन उल हक, गुलबदीन, फझलक फरुकी या त्रिकुटावर अफगाणिस्तानने लक्ष केंद्रित केलं. गुलबदीनने ४ तर नवीनने ३ विकेट्स पटकावत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. काहीतरी अनोखं करण्याऐवजी नेहमीच्या गोष्टी अचूकपणे करण्यावर ब्राव्होने भर दिला. त्याचं फळ अफगाणिस्तानला मिळालं. टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातले बदल अत्यंत निर्णायक ठरतात. रशीदला हे निर्णय घेताना ट्रॉट यांच्या अनुभवाचा फायदा झाला.

४२वर्षीय ट्रॉट यांनी दोन वर्षापूर्वी अफगाणिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली. अफगाणिस्तान संघाची ताकद आणि कच्चे दुवे ट्रॉट यांनी समजून घेतलं. त्यानुसार रणनीती आखायला सुरुवात केली. मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या संघांचं, मोठ्या नावांचं दडपण येतं. ते दडपण कसं बाजूला सारायचं हे ट्रॉट यांनी दाखवून दिलं. या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे. ट्रॉट यांनी ५२ टेस्ट, ६८ वनडेत इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.

आयपीएल स्पर्धेत दोनदा परपॅल कॅपचा मान पटकावणाऱ्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर टी२० लीग ५००हून अधिक विकेट्स आहेत. सामना सुरू असताना सीमारेषेजवळ उभं राहून ब्राव्हो गोलंदाजांशी चर्चा करताना दिसतो. काही त्रूट आढळल्यास ती लक्षात आणून देऊन सुधारणा सुचवतो. खेळाडूंइतकाच त्याचा सहभाग असतो. म्हणूनच ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ब्राव्होने खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी मैदानात धाव घेतली.