Umar Akmal has better stats than Virat Kohli in T20 World Cup : पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुपर-८ फेरीत पोहोचला आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि खेळाडूंवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कामरान अकमल म्हणत आहे की, मला कालचे आकडे आठवले, मी उमर अकमलबद्दल बोलत आहे.

‘उमर अकमलची आकडेवारी विराट कोहलीपेक्षा चांगली…’

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कामरान अकमल पुढे म्हणत आहे की, टी-२० विश्वचषकातील सामन्यांमध्ये उमर अकमलचे आकडे विराट कोहलीपेक्षा चांगले आहेत. मात्र, तो पुढे म्हणतो की, उमर विराटच्या करंगळीएवढा आहे. पण उमर अकमलचा स्ट्राईक रेट विराट कोहलीपेक्षा चांगला आहे. तसेच, उमर अकमलची टी-२० विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या विराट कोहलीपेक्षा जास्त आहे. मात्र उमर अकमलचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

MS Dhoni New Haircut Photos Viral
माहीच्या नव्या ‘हेअर स्टाइल’ने वेधले सर्वांचे लक्ष; व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘काही दिवसात तो ४३ वर्षांचा होईल यावर…’
Jasprit Bumrah is 1000 Times Better Than me Said Kapil dev
IND v ENG: “बुमराह माझ्यापेक्षा १००० पटीने…”, सेमीफायनलपूर्वी कपिल देवचं मोठं वक्तव्य, म्हणाले; “आमच्याकडे अनुभव होता”
Ashwin's reaction to Gulbadin Naib's injury
‘प्रत्येकजण शिक्षा झाली पाहिजे म्हणतोय…’, गुलबदीनच्या ‘फेक इंज्युरी’वर अश्विनचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘तो आपल्या देशासाठी…’
Rashid Khan Emotional Post SA vs AFG
५६ धावांसह अफगाणिस्तान विश्वचषकातून बाहेर! भावूक होत कर्णधार रशीद खान म्हणाला, “चांगली कामगिरी करता आली असती..”
India Batting Coach Vikram Rathour Statement on Virat Kohli
विराटच्या बॅटिंग ऑर्डरवर प्रश्न विचारताच भारताच्या प्रशिक्षकाने केली सर्वांची बोलती बंद; म्हणाले, “तुम्ही सगळे…”
Haris Rauf Statement on Viral Fight Video
“घरच्यांचा विषय निघतो तेव्हा…”, चाहत्यासह भांडणाच्या व्हायरल व्हीडिओवर हारिस रौफने मांडली आपली बाजू; पाहा काय म्हणाला?
Eagle carrying an entire adult deer
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Kohli Fervent fans rally behind Kohli with spirited chants video viral
VIDEO : ‘हमारा नेता कैसा हो, कोहली जैसा हो…’, लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांनी दिल्या घोषणा, विराट पुन्हा होणार कर्णधार?

कामराने अकमल पुढे म्हणाला, “आमच्याकडे पीआर कंपन्या नसल्यामुळे, आम्ही आमची आकडेवारी आणि कामगिरी सोशल मीडियावर शेअर करत नाही. कल्पना करा की या १५ खेळाडूंपैकी इतर कोणाची ही आकडेवारी असती, तर आतापर्यंत वादळ आले असते. त्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही. जर त्याने विराट कोहलीला टोमणा मारला असता.”

या स्पर्धेत विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक –

या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारतीय संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात आयर्लंडविरुद्ध केली. आयर्लंडविरुद्ध विराट कोहली ५ चेंडूत १ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध ३ चेंडूत ४ धावा केल्या. तर अमेरिकेविरुद्ध विराट कोहली पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. विराटने टी-२० विश्वचषकातील ३ सामन्यांमध्ये आतापर्यंत केवळ ५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – “भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी…”, अनिल कुंबळेचे गौतम गंभीरच्या प्रशिक्षक होण्याच्या चर्चांवर मोठे वक्तव्य

कामरानच्या दाव्यात किती तथ्य?

वास्तविक, उमरचे दोन आकडे कोहलीच्या तुलनेत थोडे चांगले आहेत. टी-२० विश्वचषकात कोहलीचा स्ट्राइक रेट १३०.५२ आहे तर उमरचा १३२.४२ आहे. कोहलीची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८३ धावा आहे. त्याचबरोबर उमरने ९४ धावांची इनिंग खेळली आहे. तथापि, जर आपण एकूण आकडेवारी पाहिली तर मोठा फरक आहे. कोहलीने ३० सामन्यांमध्ये ६७.४१ च्या सरासरीने ११४६ धावा केल्या आहेत ज्यात १५ अर्धशतकांचा समावेश आहे. तो टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दुसरीकडे, उमरने २० सामन्यांत ३४.७१ च्या सरासरीने ४८६ धावा केल्या आहेत. त्याने केवळ तीन अर्धशतके झळकावली आहेत.