ICC New Rule At T20 World Cup 2024 : आयपीएलच्या मागील दोन हंगामापासून इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, सामन्याच्या मध्यभागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची अदला-बदल शक्य आहे. वास्तविक, बीसीसीआय व्यतिरिक्त, आयसीसी सतत नवीन नियमांवर काम करत आहे, जेणेकरून क्रिकेट चाहत्यांसाठी मजेदार बनवता येईल. हे पाहता अनेक प्रकारचे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. मात्र, २ जूनपासून टी-२० विश्वचषक २०२४ चे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेपूर्वी स्टॉप क्लॉक नियमाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.

टी-२० विश्वचषकात निर्धारित वेळेत षटके पूर्ण न करणाऱ्या संघांना ही चूक महागात पडू शकते. आयसीसीने या विश्वचषकापासून मर्यादीत षटकांच्या स्वरूपातील स्टॉप क्लॉक नियम नियमित केला आहे. प्रयोग म्हणून हा नियम यशस्वी झाल्यानंतर आयसीसीने तो नियमित जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्यास तयार आहे. पण स्टॉप क्लॉकचा नियम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

हा नियम लागू झाल्यानंतर क्रिकेटमध्ये किती बदल होणार?

वास्तविक, स्टॉप क्लॉक नियम लागू झाल्यानंतर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नवीन षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंद दिले जातील. उदाहरणार्थ, एखाद्या संघाच्या गोलंदाजाने त्याचे षटक पूर्ण केले तर दुसरे षटक ६० सेकंदात सुरू करावे लागेल. दरम्यान, तिसरे पंच ६० सेकंदांचा टायमर सेट करतील, जेणेकरून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कोणताही गैरसमज होऊ नये आणि योग्य वेळी ओव्हर सुरू करता येईल.

हेही वाचा – T20 WC 2024 : “हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज असू शकत नाही, कारण…”, संजय मांजरेकरने रोहितच्या टीमला दिला इशारा

…म्हणून विरोधी संघाला ५० धावा मिळतील?

पण जर विरोधी संघ निर्धारित ६० सेकंदात दुसरे षटक सुरू करू शकला नाही तर काय होईल? वास्तविक, असे झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला किंमत मोजावी लागेल. त्या बदल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी म्हणून ५ धावा मिळतील. मात्र, त्याआधी पंच संबंधित संघाला दोन वेळा ताकीद देतील, मात्र तिसऱ्यांदा चूक झाल्यास विरोधी संघाला ५ अतिरिक्त धावा मिळतील. तथापि, स्टॉप क्लॉक नियम लागू झाल्यानंतर टी-२० स्वरूप किती बदलते हे पाहणे मनोरंजक असेल?

हेही वाचा – “…म्हणून युवा वेगवान गोलंदाजांना जास्त शिकवण्याचा प्रयत्न करत नाही”: जसप्रीत बुमराह असं का म्हणाला? जाणून घ्या

२३ डिसेंबरमध्ये हा नियम प्रयोग म्हणून लागू करण्यात आला होता –

आयसीसीने डिसेंबर २०२३ पासून मर्यादीत षटकाच्या स्वरूपात हा नियम लागू केला होता. या नियमामुळे सामन्यादरम्यान २० मिनिटांपर्यंतचा वेळ वाचला. या यशाने प्रोत्साहित होऊन, आयसीसीने टी-२० विश्वचषकातून मर्यादीत षटकाच्या स्वरूपात नियमित केले. आयसीसीने सामन्यादरम्यान काही परिस्थितींमध्ये हा नियम लागू केलेला नाही. मात्र, ते पूर्णपणे तिसऱ्या पंचावर अवलंबून असेल. नवीन फलंदाज आल्यास घड्याळ सुरू होणार नाही. अधिकृत ड्रिंक ब्रेक दरम्यान सवलत देखील असेल. फलंदाज किंवा क्षेत्ररक्षकाला दुखापत झाल्यास किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वेळ वाया न घालवल्यास टायमर सेट होणार नाही.