Team India record in ICC T20 World Cup history : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला २ जून पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच अमेरिकेत पोहोचला असून संघाने सरावही सुरू केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जून रोजी सराव सामना खेळवला जाणार आहे. यानंतर टीम इंडियाचा विश्वचषकातील सामना ५ जूनला आयर्लंडशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ९ जून रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. टी-२० विश्वचषकाचे आतापर्यंत ८ हंगाम खेळले गेले आहेत. टीम इंडियाने २००७ मध्ये पहिल्यांदा आणि शेवटचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. या स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास कसा राहिला ते जाणून घेऊया.

भारताने पदार्पणाच्या हंगामात जिंकला होता विश्वचषक –

टी-२० विश्वचषक स्पर्धेला २००७ साली सुरूवात झाली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफीवर नाव कोरले होते. भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. पुढच्याच हंगामात २००९ मध्ये भारतीय संघ सुपर-८ मध्ये पोहोचला. या हंगामात पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते. २०१० च्या टी-२० विश्वचषकातही टीम इंडियाने सुपर-८ पर्यंतचा प्रवास केला होता.

jannik sinner defeats taylor fritz in straight sets to win us open 2024 men title
सिन्नेरला जेतेपद : पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Rahul Dravid son Samit included in team india
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली संधी
Paralympics 2024
Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमधील ‘पॅरा’ शब्दाचा अर्थ काय? माहिती आहे का? जाणून घ्या!
India Paris Paralympics 2024 schedule: Sumit Antil will lead India's athletics charge.
विक्रमी कामगिरीचे भारताचे उद्दिष्ट! पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ
Duleep Trophy 2024 Mohammed Siraj Umran Malik Out Due To Illness and Ravindra Jadeja Released
Duleep Trophy: दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघातील ३ खेळाडूंना केलं रिलीज, काय आहे कारण?
ICC Announces Womens T20 World Cup 2024 Schedule India vs Pakistan Match on October 6
Womens T20 WC 2024: भारत पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, ICC ने जाहीर केलं T20 World Cupचे वेळापत्रक
Djokovic seeks a record 25th Grand Slam title.
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात; विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅमचे जोकोविचचे लक्ष्य

वेस्ट इंडिजकडून पत्करावा लागला होता पराभव –

२०१२ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडिया फक्त सुपर-८ पर्यंत पोहोचू शकली होती. यानंतर २०१४ मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मेन इन ब्लूचा ५व्या हंगामात चांगला प्रवास होता आणि संघाने अंतिम फेरी गाठली. मात्र, निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. टी-२० वर्ल्ड कपच्या सहाव्या मोसमात टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यात यश आले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ७ विकेट्सने पराभव करत विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आणले.

हेही वाचा – IND vs BAN Live Streaming: भारत-बांगलादेश सराव सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

टी-२० विश्वचषक २०२१ मधील कामगिरी लाजिरवाणी राहिली –

टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती. कारण संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. या हंगामात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव करून ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर फेकले.

हेही वाचा – ENG vs PAK 4th T20 : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम, इंग्लंडविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी :

टी-२० विश्वचषक २००७: भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले
टी-२० विश्वचषक २००९: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर पडली
टी-२० विश्वचषक २०१०: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर पडली
टी-२० विश्वचषक २०१२: टीम इंडिया सुपर ८ मध्ये गेली पण उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला नाही.
टी-२० विश्वचषक २०१४: टीम इंडिया अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाली.
टी-२० विश्वचषक २०१६: टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला पण वेस्ट इंडिजकडून पराभव झाला
टी-२० विश्वचषक २०२० (२१): टीम इंडिया सुपर १२ मधून बाहेर पडली.
टी-२० विश्वचषक २०२२: टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर बाहेर पडली.