टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३४ वा सामना झिम्बाब्वे विरुद्ध नेदरलॅंड्स संघात खेळला गेले. या सामन्यात नेदरलॅंड्सने झिम्बाब्वेवर ५ विकेट्सने विजय नोंदवला. झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना, नेदरलॅंड्स समोर ११८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु प्रत्युत्तरात नेदरलॅंड्सने ५ गडी गमावून विजय मिळवला. त्यामुळे आता झिम्बाब्वेने संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११८ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या नेदरलॅंड्स संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिला धक्का १७ धावसंख्येवर बसला. त्यांनंतर मॅक्स आणि टॉम कूपरने संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेट्ससाठी ७३ धावांची भागीदारी केले. मॅक्सने नेदरलॅंड्स संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४७ चेंडूत ५३ धावांची खेळी केली.

टॉम कूपरने देखील त्याला चांगली साथ देताना, २९ चेंडूत ३२ धावा केल्या. दरम्यान नेदरलॅंड्स संघाच्या इतर फलंदाजांना मात्र आपली छाप पाडता आली नाही. तरी सुद्धा नेदरलॅंड्सने १८ षटकांत ५ गडी गमावून १२० धावा करत लक्ष्य पूर्ण केले. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नागरावा आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ल्यूक जोंगवेने एक विकेट घेतली.

तत्पुर्वी झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय हा सपशेल चुकीचा ठरला. पहिल्या सहा षटकात केवळ २० धावांत झिम्बाब्वेने तीन गडी गमावले होते. शॉन विलियम्स आणि अष्टपैलू सिकंदर रझा या दोघांनाच केवळ दोन आकडी धावसंख्या करता आली. शॉन विलियम्सने २३ चेंडूत २८ धावा केल्या तर सिकंदर रझाने २४ चेंडूत ४० धावा केल्या. त्यांच्या या ४८ धावांच्या भागीदारीने झिम्बाब्वेला शंभरी गाठता आली.

हेही वाचा – “क्रिकेटप्रतीचं प्रेम तुम्हाला बाजारातून भाजीपाला विकत घेऊन देणार नाही”; वेस्ट इंडिज बोर्डाच्या निर्णयावर डेरेन सॅमी संतापला

नेदरलँड्सच्या संघाने भेदक गोलंदाजी करत झिम्बाब्वेला १९.२ षटकात ११७ धावांवर रोखले. नेदरलँड्स कडून पॉल व्हॅन मीकरेनने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर ब्रँडन ग्लोव्हर, बास डी लीडे आणि लोगन व्हॅन बीक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज फ्रेड क्लासेनला एक विकेट घेण्यात यश मिळाले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Max and tom coopers partnership saw netherlands beat zimbabwe by 5 wickets vbm
First published on: 02-11-2022 at 13:55 IST