Siraj hits the ball to Rizwan : अनेकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतात तेव्हा मैदानावर चांगलीच चुरस पाहायला मिळते. दोन्ही संघांचे खेळाडू खूप उत्साहात असतात. हा उत्साह केवळ खेळाडूंमध्येच नाही तर दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्येही दिसून येतो. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ धावांनी मात आपले वर्चस्व कामय राखले. मात्र, आता या सामन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने रिझवानच्या दिशेने एक थ्रो फेकला, जो थेट रिझवानला लागला होता. ज्यावर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

या सामन्यात जेव्हा मोहम्मद सिराज डावाच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करत होता, तेव्हा मोहम्मद रिझवान त्याच्यासमोर फलंदाजी करत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रिझवानने शॉट खेळला आणि चेंडू थेट सिराजच्या हातात आला. यानंतर सिराजने चेडू लगेच पकडला आणि वेगाने स्टंपच्या दिशेने भिरकवला. पण तो चेंडू स्टंपवर न आदळता थेट रिझवानला लागला. मात्र, चेंडू लागल्यानंतर सिराजने रिझवानची विचारपूस केली. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सिराजने मुद्दाम रिझवानला चेडू मारला?

मोहम्मद सिराज आणि मोहम्मद रिझवानच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे सिराजने रिझवानला मुद्धाम थ्रो मारला होता का? असा ही प्रश्न उपस्थि होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून चाहते विविध गोष्टीही लिहित आहेत. एका यूजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, “सिराजने हे काय केले… भाई विकेट कुठे आहे आणि सिराज कुठे थ्रो करतोय, हे योग्य नाही. रिजवान भाईला जखमी केले.”

हेही वाचा – IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयाचे ‘हे’ तीन ठरले मोठे टर्निंग पॉईंट, अन्यथा पाकिस्तान संघाने मारली होती बाजी

काय घडलं सामन्यात?

टी-२०- विश्वचषक २०२४ चा १९ वा सामना रविवारी कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने १९ षटकांत १० गडी गमावून ११९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून ११३ धावाच करू शकला. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीमुळे रोहित शर्माच्या सेनेने सामना सहा धावांनी जिंकला. या सामन्यात वेगवान गोलंदाजाने एकूण तीन विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ३.५० च्या इकॉनॉमी रेटने केवळ १४ धावा दिल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

हेही वाचा – IND vs PAK : जय शाहांचा आनंद गगनात मावेना! भारताच्या विजयानंतर BCCI सचिवांचं दिसलं कधी न पाहिलेले रुप; VIDEO व्हायरल

टीम इंडियाने सर्वात लहान धावसंख्येचा केला यशस्वी बचाव –

टी-२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. या बाबतीत भारताने श्रीलंकेची बरोबरी केली. दोघांनी १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला आहे. श्रीलंकेने २०१४ च्या टी-२० विश्वचषकात चितगाव येथे न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्याच वेळी, भारतीय संघाने टी-२० मध्ये यशस्वी बचाव केलेली ही सर्वात लाहन धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता.