टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये पाकिस्तानच्या उपांत्य फेरीची चावी टीम इंडियाच्या हातात आहे. जर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला, तर पाकिस्तानचा संघ जवळपास २०२२ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तमाम पाकिस्तानी चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज मोईन खानने या सामन्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली, ज्यामध्ये इमाद वसीमने त्याचे समर्थन केले आहे.

पाकिस्तानी अँकर प्रश्न विचारताना म्हणाला, ‘२०१९ च्या विश्वचषकात भारताचा सामना इंग्लंडसोबत होता आणि धोनी खेळत होता, पण चतुराई बघा, असे वाटले की भारताने मुद्दाम तो सामना गमावला. ज्यामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला. असे का?’

ज्यावर मोईन खान म्हणतो, ”२०१९ मध्ये अशा गोष्टी घडल्या आहेत. मग मी माझ्या मित्राशी संवाद साधत होतो, तो मला सांगत होता की भारत कसा हरला ते पहा. ज्यावर मी त्याला म्हणालो की बघ कोण गेम सोबत गेम करेल, गेम त्याच्यासोबत गेम करेल. आणि भारताबाबतही तेच झाले, तेही बाहेर गेले.”

मोईन खान पुढे म्हणतो, ‘ते ज्या पद्धतीने खेळत होते, त्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांना पाकिस्तानने स्पर्धेत पुढे जावे असे वाटत नव्हते. उद्या भारताने असे काही केले तर मला वाटते भारत या विश्वचषकातूनही बाहेर पडेल.”

इमाद वसीम या प्रकरणावर भाष्य करताना म्हणतो, ‘आम्हीही सामना पाहत होतो. कारण आम्हाला पात्रता मिळवायची होती. भारत जिंकेल अशी आम्ही प्रार्थना करत होतो. पण दुर्दैवाने ते त्यांच्याच नशिबाने हरले. त्यावेळी आम्हालाही थोडं असं वाटलं. पण उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते तसे करू शकणार नाहीत. कारण त्यांनी असे काही केले तर ते स्वतःच अडकतील.”

हेही वाचा – T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उतरताच रोहित शर्माने मोडला दिलशानचा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू