Sandeep Lamichhane Visa Denied Second Time by US : नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछानेसाठी अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नेपाळमधील अमेरिकन दूतावासाने पुन्हा एकदा लामिछाने व्हिसा देण्यास नकार दिला आहे. ही माहिती देताना नेपाळ क्रिकेट असोसिएशनने सांगितले की, व्हिसा न मिळाल्याने लमिछानेची टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता आता नगण्य आहे. लामिछानेची नुकतीच उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. नेपाळ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील आपला पहिला सामना ४ जून रोजी डॅलास येथे नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे.

गेल्या आठवड्यातही अमेरिकेने लामिछानेला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा व्हिसा देण्यास नकार दिला होता. नेपाळ क्रिकेट असोसिएशनच्या केंद्रीय समितीचे सदस्य चुंबी लामा यांनी सांगितले की, लामिछानेला अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. लामिछाने हा नेपाळ क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे, मात्र बलात्काराचे प्रकरण समोर आल्यामुळे त्याला यापूर्वी संघात स्थान देण्यात आले नव्हते.

Shubman Gill has no idea about captaincy
Shubman Gill : शुबमनच्या नेतृत्त्वावर अमित मिश्राने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘त्याला कर्णधारपदाबद्दल काहीच माहिती नाही…’
copa america 2024 final argentina vs colombia match prediction
Copa America 2024 : तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाला संधी; कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचे आव्हान
Andre Russells six hit video viral
MLC 2024: विराटनंतर रसेलनेही हरिस रौफला दाखवले तारे, ३५१ फूट उंच मारलेल्या षटकाराचा VIDEO व्हायरल
Sanath Jayasuriya, sri lanka head coach
श्रीलंकेच्या संघाला सावरणार ‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू, भारताविरूद्धच्या मालिकेपासून स्वीकारणार हेड कोचचा पदभार
Rohit Sharma on Koi Garden ghuma kya question
VIDEO: टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये कोणी गार्डनमध्ये फिरलं का? रोहित शर्मा म्हणाला, “मला असा संघ मिळाला…”
Virat Kohli Meets Childhood Rajkumar Sharma Coach photo viral
Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल
Sreesanth Slams Riyan Parag For Not Supporting India In T20 World Cup 2024
“आधी देशभक्त हो…”, रियान परागच्या वादग्रस्त वक्तव्यावर श्रीसंत संतापला; पण नेमकं काय घडलं?
Jay Shah said two names shortlisted for Team India coach
“दोन नावं शॉर्टलिस्ट…”, गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या चर्चांदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाहांचा मोठा खुलासा

लामिछानेसाठी विश्वचषक खेळणे कठीण –

संदीप लामिछानेला व्हिसा मिळवून देण्यासाठी नेपाळ सरकार प्रयत्नशील असले, तरी लामिछाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता नाही. आयसीसीच्या नियमांनुसार २५ मे पर्यंत कोणताही संघ आपल्या संघात बदल करू शकतो, परंतु आता संघात कोणताही बदल केल्यास आयसीसीच्या तांत्रिक समितीची मान्यता घ्यावी लागेल.

हेही वाचा – फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : श्वीऑटेकचा संघर्षपूर्ण विजय; ओसाकावर मात; सबालेन्का, सिन्नेर, मेदवेदेवचीही आगेकूच

उच्च न्यायालयाने लामिछाने दिला होता दिलासा –

नेपाळच्या पाटण उच्च न्यायालयाने १५ मे रोजी लामिछानेवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी अंतिम निकाल दिला होता. संदीप निर्दोष असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. काठमांडू जिल्हा न्यायालयाने दिलेला शिक्षा आणि दंडाचा निर्णय न्यायालयाने रद्द केला. खरं तर, यापूर्वी काठमांडू जिल्हा न्यायालयाने संदीपला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं होतं आणि त्याला आठ वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी न्यायालयाने त्याला बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

हेही वाचा – क्रिकेटची खरी मजा ११ खेळाडूंनी खेळण्यातच!; ‘प्रभावी खेळाडू’च्या नियमाबाबत भारताचा यष्टिरक्षकफलंदाज जितेश शर्माचे मत

लामिछाने जगभरातील अनेक लीगमध्ये सहभाग घेतलाय –

लामिछानेने बिग बॅश लीगसह जगभरातील अनेक टी-२० लीगमध्ये भाग घेतला आहे. संदीपने नेपाळकडून आतापर्यंत ५१ वनडे आणि ५२ टी-२० सामने खेळला आहे. त्याच्या नावावर ५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११२ विकेट्स आणि ५२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९८ विकेट्स आहेत. याशिवाय संदीपने आयपीएलमध्ये नऊ सामने खेळला असून १३ विकेट्स घेतल्या आहेत. एकूणच संदीपने जगभरातील लीगसह एकूण १४४ टी-२० सामने खेळला आहे. यामध्ये त्याने २०६ विकेट्स घेतल्या आहेत. संदीपच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन विकेट्स आहेत आणि लिस्ट-ए मध्ये त्याच्या नावावर १५८ विकेट्स आहेत. संदीपची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ११ धावांत ६ विकेट्स आहे. त्याच वेळी, संदीपची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे नऊ धावांत ५ विकेट्स आहे.