Virat Kohli’s Reaction to Cricket in America : विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेट हा खेळ जगभर प्रसिद्ध करण्यात कोहलीने महत्त्वाचे योगदान दिले आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता पहिल्यांदाच अमेरिकेत टी-२० विश्वचषक होणार आहे, त्याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे. पण अमेरिकेत विश्वचषक आयोजित करण्याचा प्रयोग यशस्वी होईल का, असे अनेक मोठे प्रश्न आहेत. विराट कोहलीने स्वतः या विषयावर एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली म्हणाला, अमेरिकेत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळले जाऊ शकते असे मला कधीच वाटले नव्हते.

विराट कोहली काय म्हणाला?

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा अमेरिकेतील पोहोचलेल्या टीम इंडियात सामील झाला आहे. प्रथमच अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला की, “मी कधीही अमेरिकेत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकेन, असे वाटले नव्हते. आता हे वास्तव बनले असून यावरून जगात क्रिकेट खेळाचे महत्त्व वाढत असल्याचे दिसून येते. अमेरिकेत कदाचित असे बरेच लोक असतील, ज्यांनी हा खेळ स्वीकारला आहे आणि विश्वचषकाचे आयोजन करून जागतिक स्तरावर क्रिकेट स्वीकारणारा हा कदाचित पहिला देश ठरणार आहे.”

अमेरिकेतील क्रिकेटवर विराटची प्रतिक्रिया?

आपले बोलणे पुढे चालू ठेवत विराट कोहली म्हणाला, “विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटला चालना देणे ही सर्वोत्तम सुरुवात म्हणता येईल. मला आशा आहे की अमेरिकेत क्रिकेटचा असाच प्रसार होत राहील. आपल्या देशातील असे अनेक लोक आहेत,जे या खेळाला अमेरिकेत पुढे घेऊन जाण्यात मदत करतील. त्यामुळे इतर देशांतही क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याची जागरुकता वाढू शकेल. मेजर क्रिकेट लीग देखील खूप पुढे जाऊ शकते, म्हणजेच फ्रँचायझी क्रिकेट येथे आधीच सुरू झाले आहे. मला वाटते की क्रिकेटचा खेळ योग्य दिशेने पुढे वाटचाल करत आहे.”

हेही वाचा – Smriti Palash : स्मृती मंधाना बनली पलाश मुच्छलची विद्यार्थीनी, पियानो वाजवतानाचा VIDEO व्हायरल

टी-२० विश्वचषक २०२४ मधील संघांचे गट:

अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान