PAK vs ENG Finals Highlight: T20 विश्वचषक 2022 मधील रोलर-कोस्टर खेळ आज अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान व इंग्लंड आमनेसामने आले आहेत. टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ सामन्यात भारत आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकला गेला होता, मात्र त्यानंतर एका पाठोपाठ एक ट्विस्टमुळे आता भारत विश्वचषकातून बाहेर पडून पाकिस्तान अंतिम सामना लढत आहे.

इंग्लंड विरुद्ध अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना फार चांगली सुरुवात केली नव्हती. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ दुबळा दिसत होता पाकिस्तानने इंग्लंडला ८ गडी बाद होऊन १३८ धावांचे लक्ष्य दिले आहे. तरीही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व क्रिकेटर इमरान खान यांना मात्र पाकिस्तानच्या विजयाची शाश्वती वाटत आहे. यासाठी त्यांनी बाबर आझम आणि कंपनीसाठी एक खास ट्वीटही केले आहे.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 CSK Bowler Mustafizur Rahman Return to Bangladesh to Sort visa issue for T20 World Cup
IPL 2024: चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आयपीएल सुरू असतानाच अचानक मायदेशी का परतला? काय आहे कारण
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

पाकिस्तानचे माजी कर्णधार इमरान खान, यांनी स्वतः १९९२ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी संघाचे नेतृत्व केले होते. १९९२ नंतर आज इंग्लंडच्याच समोर पाकिस्तानला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची सुवर्णसंधी आहे. अशावेळी इमरान खान यांनी ट्वीट करत म्हंटले की, “पाक क्रिकेट संघाला आज मी तेच सांगेन जे मी १९९२ च्या विश्वचषक फायनलमध्ये माझ्या संघाला सांगितले होते. आधीतर आपल्याला क्वचितच खेळायला मिळत असल्याने या सामन्याचा आनंद घ्या. खचून जाऊ नका. दुसरे: तुम्ही जोखीम पत्करण्यास तयार असाल आणि प्रतिस्पर्ध्यांच्या चुका रोखू शकत असाल तर तुम्ही जिंकाल यात शंका नाही. आक्रमक मानसिकतेने खेळा. संपूर्ण देश तुमच्या यशासाठी प्रार्थना करत आहे”

पाकिस्तान करणार १९९२ ची पुनरावृत्ती?

T20 World Cup 2024 मध्ये ‘हे’ चेहरे बघायचे नाहीत.. ;विरेंद्र सेहवागचा BCCI ला स्पष्ट शब्दात इशारा

दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानेही सामन्याआधी संवाद साधताना मागील 3-4 सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघ वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही स्तरावर खूप चांगला खेळला आहे. यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. अंतिम फेरी गाठणे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटते, आम्ही चांगली सुरुवात करू शकलो नव्हतो मात्र आता उत्तम शेवट करू असा विश्वास दर्शवला होता. पाकिस्तानने यापूर्वीच एकदा (२००९ मध्ये) T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे.